मोठी बातमी! उद्धव ठाकरे अलर्टमडोमध्ये; मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक, आमदारांना महत्त्वाच्या सूचना, नेमकं काय घडतंय?

राजकीय वर्तुळात आता पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर 2 ची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती, त्यानंतर आता पुन्हा एकदा एक मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरे अलर्टमडोमध्ये; मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक, आमदारांना महत्त्वाच्या सूचना, नेमकं काय घडतंय?
uddhav thackeray
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 01, 2026 | 3:33 PM

राजकीय वर्तुळात आता पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर 2 ची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का होता. दरम्यान त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे 14 आमदार देखील फुटणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे हे सर्व सुरू असतानाच दुसरीकडे पनवेलच्या सेक्टर 19 मध्ये झेरॉक्सच्या शॉपमध्ये बीएलओचे एसआरएचे फॉर्म सापडले आहेत. या दोन्ही पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अलर्ट मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे.

पनवेल महापालिकेच्या शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेत्या लीना गरड यांनी दिलेल्या माहितीनुसार पनवेलच्या सेक्टर 19 मध्ये झेरॉक्सच्या शॉपमध्ये बीएलओचे एसआरएचे फॉर्म सापडले आहेत. ते सर्व एसआयआर फॉर्म हे कोरे होते. म्हणजे कुठेतरी बोगस मतदारांची नोंद केल्याचा हा प्रकार आहे, विरोधकांचे मतदान कमी करणे आणि बोगस मतदान वाढवणे हेच सुरू असल्याचं यातून लक्षात येतं. ही गोष्ट लोकशाहीसाठी खूप घातक आहे. ही धक्कादायक घटना खारघरमध्ये घडली आहे, असा आरोप गरड यांनी केला आहे.

दरम्यान त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे अलर्ट मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे.पनवेल खरघरमध्ये एसआयआर फॉर्म झेरॉक्स प्रकरणानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पनवेलमधील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला काही लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. एजेंटचा फोन आला तर रेकॉर्ड करा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी माहिती देताना सांगितलं की, एजेंटचा फोन आला तर तो रेकॉर्ड करा, अशा सूचना सर्व आमदारांना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. आमदार आणि नगरसेवक फुटीवर उद्धव ठाकरेंनी या सूचना दिल्या आहेत. शिंदे सेनेत गेलेल्या काही पदाधिकारी आणि एजंट्स कडून फोन, मेसेज सुरू आहेत, असंही महेश सावंत यांनी म्हटलं आहे. मात्र माझी भुमिका जिना यहां, मरना याहॉ, अशीच असेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं.  आमदार फुटणार नाहीत, वातावरण बिघडण्यासाठी वावड्या उठवले जात आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us