Uddhav-Raj Thackeray Morcha Mumbai LIVE : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाची जोरदार तयारी सुरू

Uddhav Thackeray Raj Thackeray Garjana Morcha Mumbai Live News Updates in Marathi : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त मोर्चाच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे.

Uddhav-Raj Thackeray Morcha Mumbai LIVE : ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाची जोरदार तयारी सुरू
live blog
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 9:18 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 04 Oct 2026 09:40 AM (IST)

    ‘गर्जना’ मोर्चासाठी मोठा पोलीस फौजफाटा

    ठाकरे बंधूंचा आज ‘गर्जना’ मोर्चा थोड्याच वेळात निघणार आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांकडून सर्व प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेटींग करण्यात आलेली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत विराट ‘गर्जना’ मोर्चा निघेल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारातून मोर्चाचे आयोजन केले आहे.

  • 04 Oct 2026 09:30 AM (IST)

    आम्ही गिरगांवकर यांच्याकडून मोर्चे स्थळी बोलके बॅनर

    आम्ही गिरगावकर या संस्थेकडून आज ठाकरेंच्या मोर्चे स्थळी वेगवेगळ्या बॅनर लावण्यात आलेले आहे त्यामध्ये ज्ञानेश्वर कुमार यांच्या विरोधामध्ये बॅनर पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश्वर कुमार यांनी पुन्हा एकदा आम्हाला मॅनेज करून सरकार आणून दे मग त्यानंतर आम्ही मराठी लोकांना मुंबईतून बाहेर काढू व हळूहळू मुंबई शाकाहारी करू असा आशय या बॅनर वरती लिहिण्यात आलेला आहे. विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे..


  • 04 Oct 2026 09:20 AM (IST)

    मनसे नेते गजानन काळे वं कार्यकरते मुबंईच्या दिशेने निघाले

    केंद्रीय निवडणुक आयोगाच्या विरोधातला पहिला हा मोर्चा आहे. दोन्ही ठाकरे बंधू याचे नेतृत्व करणार आहे मला वाटतं ही मोठी ऐतिहासिक घटना आहे ईव्हीएम आणि मतचोरी याबद्दल सर्वप्रथम बोलले असेल तर राज ठाकरे बोलले आहेत. काल तरुणांनी ट्रेलर दाखवला आज ठाकरे बंधू पिक्चर महाराष्ट्राला आणि जगला दाखवून देतील. आज रेकॉर्ड ब्रेक ठाकरेंचा मोर्चा होणार आहे

  • 04 Oct 2026 09:08 AM (IST)

    मुख्यमंत्री हुशार माणूस -रोहित पवार

    मुख्यमंत्री हुशार माणूस आहेत आमच्यात मतभेद आहेत मात्र विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही त्यांच्याशी चर्चेला तयार आहे
    मुख्यमंत्र्यांनी बोलवलं तर मी जाणार नाही मात्र विद्यार्थी चर्चेसाठी जातील. दुष्काळामुळे शेतकरी पूर्णतः आर्थिक अडचणीत आला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा आंदोलन संपल्या संपल्या लगेच मी दुष्काळ दौऱ्यावर निघणार आहे. राजकारणात सध्या निवडणुकीत काय चालले हे मला माहीत नाही सध्या मी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लढत आहे, असे पवार म्हणाले.

  • 04 Oct 2026 09:00 AM (IST)

    मुंबईच्या मेट्रो परिसरात शिवसैनिक गावाखेड्यातून दाखल होण्यास सुरुवात

    मुंबईच्या मेट्रो परिसरात शिवसैनिक गावाखेड्यातून दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. बाळासाहेबांच्या काळातील जुने शिवसैनिक मोहन यादव हे पुन्हा या मोरच्यात आकर्षणाचं केंद्र ठरले आहेत. त्यांची भगव्या रंगाची शिवसेना गाडी आकर्षणाचं केंद्र आहे. राज ठाकरे हे भावी मुख्यमंत्री तर उद्धव ठाकरे हे भावी पंतप्रधान व्हावेत, मनसे शिवसेनेत विलीन करावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे…


  • 04 Oct 2026 08:59 AM (IST)

    ठाकरेंच्या मोर्चास्थळी मायकल जॅक्सनचा बॅनर

    लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आज ठाकरे बंधूंकडून मोर्चाची घोषणा करण्यात आलेली आहे. आज मुंबईतील मेट्रो सिग्नल ते मुंबई महानगरपालिकापर्यंत मोर्चा असणार आहे. या मोर्चास्थळी अनेक बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्येच एक मायकल जॅक्सनचा देखील बॅनर लागलेला आहे. या बॅनरवर बाळासाहेब असते तर त्यांनी हे कधीच होऊन दिलं नसतं, हे क्रूर सरकार हे सर्व करून आणत आहे, असा संदेश आहे.

  • 04 Oct 2026 08:55 AM (IST)

    ठाकरे बंधूंचा आज ‘गर्जना’ मोर्चा; पोलिसांकडून सर्व प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेटींग

    ठाकरे बंधूंचा आज ‘गर्जना’ मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मोर्चातून केली जाणार आहे. पोलिसांकडून सर्व प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेटींग लावण्यात आले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत विराट ‘गर्जना’ मोर्चा आयोजित केला जाणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारातून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी १० वाजता मेट्रो सिनेमा जंक्शनपासून मोर्चाला सुरुवात होणार आहे.

  • 04 Oct 2026 08:45 AM (IST)

    अभिजीत दिपकेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- दादरमधील स्थानिक रहिवासी

    अभिजीत दिपकेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक रहिवाशींनी केली. कालच्या आंदोलनामुळे वृद्ध व्यक्तीचा हार्टअॅटकने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलं आहे. यावेळी दादर परिसरातील नागरिकांनी दिपकेंवर टीका देखील केली. स्थानिकांची मागणी पोलिसांकडून मान्य होते का, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

  • 04 Oct 2026 08:40 AM (IST)

    नाशिकमधील मनसे पदाधिकारी मोर्चासाठी मुंबईकडे रवाना

    ठाकरे बंधूंच्या मुंबईतील मोर्चासाठी नाशिकमधून मनसे पदाधिकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चात नाशिकमधील मनसैनिक सहभागी होत आहेत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकडे रवाना होत आहेत. शेकडो मनसैनिक मुंबईकडे रवाना होत आहेत. घोषणाबाजी करत मुंबईकडे रवाना होत आहे.

  • 04 Oct 2026 08:30 AM (IST)

    प्रत्येक मुंबईकर मोर्चात सहभागी होणार – ठाकरे गट

    ठाकरे गटाचे संतोष शिंदे म्हणाले,  आज गर्जना मोर्चा पार पडतोय आमची तयारी पूर्ण झालेली आहे. प्रत्येक मुंबईकर या मोर्चात सहभागी होणार आहे. भायखळा ते सीएसटी असा आधीचा रूट होता, तो काही कारणास्तव बदलण्यात आला. मात्र इथेही मोठी गर्दी होणार आहे.मुख्य निवडणुक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा व्हावा यासाठी हा मोर्चा आहे. मेट्रो सिनेमाजवळून मोर्चा आम्ही सुरुवात करणार आहोत’.

  • 04 Oct 2026 08:10 AM (IST)

    गर्जना मोर्चामध्ये काँग्रेस सहभागी होणार – नाना पटोले

    मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ठाकरे बंधूंच्या मोर्च्यामध्ये काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याचे नाना पटोलेंकडून स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे की, SIR च्या माध्यमांतून आणि मतचोरीच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्या काही गडबडी केल्या आहेत, त्याची वस्तुस्थिती आता जनतेसमोर आली आहे. देशातील लोकशाही वाचवणे हे केवळ काँग्रेस पक्षाचेच नव्हे, तर देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे’.

  • 04 Oct 2026 08:08 AM (IST)

    Garjana Morcha : गर्जना मोर्चाच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त

    गर्जना मोर्चाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मेट्रो सिनेमा चौक ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत हा पायी चालत आंदोलन होणार आहे.  निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंच आंदोलन आहे. आजच्या आंदोलनात शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष सामील होणार आहे.

मुंबईत ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चाची तयारी सुरू झाली आहे. सीएसएमटी समोरील बीएमसी रोडवर ट्रकवर स्टेजची उभारणी सुरू आहे. सीएसएमटी समोरील मेट्रो सिनेमाकडे जाणारे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मेट्रो सिनेमापासून बीएमसी मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहेत. या मोर्चाला मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी होण्याची शक्यता आहे. सीजेपीचं आंदोलक कार्यकर्ते देखील मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेही या गर्जना मोर्चाला पांठिबा दिला आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षानेही मोर्चाला पाठिंबा दिला आहे. गर्जना मोर्चासहित देश-परदेशातील घडामोडी जाणून घ्या .

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us