AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राने केला 9 कोटी 14 लाख लसीकरणाचा टप्पा पार

एकुण 9,14,34,586 लाभारत्यांच्या लसीकरणात आतापर्यंत 6,32,70,144 जणांना पहिला डोस मिळालेला आहे आणि 2,81,64,442 जणांचा दुसरा डोस घेऊन लसीकरण पूर्ण झाले आहे.

महाराष्ट्राने केला 9 कोटी 14 लाख लसीकरणाचा टप्पा पार
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Oct 18, 2021 | 3:41 PM
Share

मुंबईः महाराष्ट्र हा भारताच्या लसीकरण मोहीमेत कायमच अग्रेसर राहिलेला आहे. रविवारी महाराष्ट्राने 9.14 कोटी  लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार राज्यात रविवारी संध्याकाळ पर्यंत 1,29,221 लोकांना लस टोचण्यात आली आणि लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आता पर्यंत 9,14,34,586 लोकोंचे लसीकरण झोले आहे.

कोणाला किती डोस

एकूण 9,14,34,586 लाभार्थ्यांच्या  लसीकरणात आतापर्यंत 6,32,70,144 जणांना पहिला डोस मिळालेला आहे आणि 2,81,64,442 जणांचा दुसरा डोस घेऊन लसीकरण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत एकूण लाभारत्यांपैकी 18 ते 44 वयोगटातील 3,38,90,580 जणांना पहिला डोस आणि 99,34,176 लोकांना दुसरा डोस घेऊन लसीकरण पूर्ण झाले आहे. 45+ वयोगटातील लाभारत्यांपैकी 2,59,40,566 जणांना पहिला डोस आणि 1,53,10,357 जणांनी दुसरा डोस घेऊन लसीकरण पूर्ण झाले आहे.

हेल्थ केअर (आरोग्य कर्मचारी) गटात आतापर्यंत 1,2,93,710 कर्मचाऱ्यांना पहिला आणि 11,04,813 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस मीळालेला आहे. फ्रंट लाईन कर्मचारी गटात आपर्यंत 21,45,288 जणांना पहिला आणि 18,15,136 जणांना दुसरा डोस मीळालेला आहे.

मुंबईची स्थती

मुंबईचा लसीकरणात पहिल्या नंबरला आहे. मुंबईत एकुण 1,39,65,876 डोस दिले गेलेले आहेत. पुणे जिल्हा दुसऱ्या नंबरवर आहे आणि एकूण 1,15,01,073 डोस दिले गेले आहेत. मुंबईत लसीकरणाचा आकडा जरी चांगला असला तरी मुंबईत मागच्या काही दिवसांपासून लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे. जवळपास 50% डोस दररोज शिल्लक राहत आहेत. प्रतिदिन मुंबईत 1 लाख 50 हजार ते २ लाख लोकांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे मात्र सध्या मुंबईत प्रतिदिन लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असूनही सार्वजनिक लसीकरण केंद्रावर फक्त 50 ते 90 हजार लोकांचे लसीकरण होत आहे.

देशात पुढच्या काही महिन्यात पात्र नागरीकांच 100 % लसीकरण पूर्ण करण्याचे उद्धिष्ट असताना मुंबईत लसीकरणाचा वेग मंदावणे हि गंभीर बाब आहे. हेच लक्ष्यात घेत मुंबई महानगरपालिके ने आता मुंबईत झोपडपट्ट्या व काही सामूहिक इमारतींसाठी सार्वजनिक जागेवर तात्पुरते लसीकरण केंद्र उपलब्ध करून देण्याची महापालिका योजना आखात आहे. महिला, विद्यार्थीं , वंचित गट इत्यादी करीत विशेष लसीकरण सत्र आयोजन, गरज असल्यास लसीकरण केंद्रावरील वेळेत व सत्रात फेर बदल असे काही उपक्रम मुंबईत लसीकरण गतिमान करण्यासाठी राबविण्यात येतील. ता लसीकरणासाठी लोकांनी पुढे येण्यासाठी उपक्रम सुरु केले आहेत.

(vaccination in maharashtra latest figures)

Edited by- Devashri Bhujbal

संबंधित बातम्या

मोठी बातमी! दिवाळीच्या तोंडावर निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांची आज टास्कफोर्ससोबत बैठक, दुकानं, लोकलबाबत मोठा निर्णय शक्य

मुंबईकरांसाठी आजच दसरा दिवाळी, एकाही कोरोना मृत्यूची नोंद नाही, संक्रमणाचा रेटही घटला

‘टोपे साहेब आता विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरचीही व्यवस्था कराच’, परीक्षेच्या गोंधळावरुन भातखळकरांचा आरोग्यमंत्र्यांना टोला

Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश