ED raids on Pratap Sarnaik : ईडीच्या चौथ्या आदेशानंतरही विहंग सरनाईक चौकशीला गैरहजर, कारवाईची शक्यता

महत्त्वाचं म्हणजे विहंग याला आतापर्यंत अनेकवेळा समन्स बजावण्यात आले आहेत. सोमवारी त्याला चौथा समन्स बजावण्यात आला होता.

ED raids on Pratap Sarnaik : ईडीच्या चौथ्या आदेशानंतरही विहंग सरनाईक चौकशीला गैरहजर, कारवाईची शक्यता
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 4:02 PM

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकल्यानंतर (ED raids on Pratap Sarnaik) त्यांच्या कुटुंबाची वारंवार चौकशी सुरू आहे. आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक (Vihang Sarnaik) याचीदेखील ईडीकडून चौकशी करण्यात आली. पण आज म्हणजेच मंगळवारी विहंग सरनाईक चौकशीसाठी गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे. विहंग याला ईडी अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगीतल होतं. पण तो गेलाच नसल्याचं सांगण्यात येत आहे. (Vihang Sarnaik absent from inquiry even after EDs fourth order, possibility of major action)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने समन्सद्वारे विहंगला चौकशीसाठी येण्यास सांगितलं होतं. पण तरीदेखील तो गैरहजर राहिला. महत्त्वाचं म्हणजे विहंग याला आतापर्यंत अनेकवेळा समन्स बजावण्यात आले आहेत. सोमवारी त्याला चौथा समन्स बजावण्यात आला होता. यानुसार आज 1 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत त्याला हजर राहायला सांगण्यात आलं होतं. पण विहंग चौथ्या समन्सनंतरही ईडी कार्यलयात हजर झाला नाही. यामुळे आता ईडी विहंग याच्यावर कडक कारवाई करण्याची असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खरंतर, टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावला आहे. प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक यालाही ईडीने समन्स बजावला आहे. त्यात प्रताप सरनाईक यांना ईडीच्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. पण तरीही विहंग सरनाईक चौकशीसाठी गैरहजर राहिला.

ईडीने मंगळवारी (25 नोव्हेंबर) प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली. त्यानंतर प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वारंटाईन राहावं लागत आहे. शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी ईडीला कळवलं होतं.

यानंतर आता आठ दिवसांनी प्रताप सरनाईकांना ईडीने पुन्हा एकदा समन्स जारी केला. यात ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान विहंग सरनाईक यांना ईडीनं दोन वेळा समन्स बजावलं आहे. मात्र ते चौकशीला हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांची पुन्हा एकदा ईडीकडून चौकशीसाठी होऊ शकते, असे सांगितले जात आहे. ही चौकशी टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या –

आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंगला ईडीकडून पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता

Money Laundering Case | आज विहंग सरनाईकांना पुन्हा ईडीचे समन्स

(Vihang Sarnaik absent from inquiry even after EDs fourth order, possibility of major action)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.