Abdul Sattar : ठाण्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या दहीहंडीची सगळीकडे चर्चा, अब्दुल सत्तारांनी केलं कौतुक

| Updated on: Aug 19, 2022 | 7:16 PM

दोन वर्षात कोरोना संकटात धार्मिक, सामाजिक कार्यक्रम झाले नव्हते. यावेळेस एकनाथ शिंदे सरकारने खुल्या मनाने, खुल्या दिलाने लोकांना मदतीची घोषणा केली,

Abdul Sattar : ठाण्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या दहीहंडीची सगळीकडे चर्चा, अब्दुल सत्तारांनी केलं कौतुक
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

वर्धा : आज राज्यात उत्साहात दहीहंडी (Dahi Handi) उत्सव साजरा केला जात आहे. ठाण्यात देखील सकाळपासून दहीहंडी जोरात सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाण्यात दहीहंडीचं आयोजन केलं आहे. त्यामुळे तिथं आज दिवसभरात मोठ्या राजकीय नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर राज्यात यापुढे देखील असेचं उत्सव साजरे होणार असल्याची ग्वाही जनतेला दिली. मुंबईसह राज्यात यंदा दोन वर्षानंतर दहीहंडी साजरी होत आहे. त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचं वातावरणं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल गोविंदा पथकातील जखमी गोविंदांसाठी जाहीर केलेल्या योजनेची माहिती सुध्दा त्यांनी दिली.

राज्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात

दोन वर्षात कोरोना संकटात धार्मिक, सामाजिक कार्यक्रम झाले नव्हते. यावेळेस एकनाथ शिंदे सरकारने खुल्या मनाने, खुल्या दिलाने लोकांना मदतीची घोषणा केली, त्याचबरोबर कार्यक्रमाची घोषणा केली. विशेषतः दहीहंडीचा सण फार मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. येणाऱ्या काळात मुंबई, पुणे व्यतिरिक्त सगळीकडे हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात होईल असंही आश्वासन त्यांनी दिलं.

हे सुद्धा वाचा

दहीहंडीचा सराव करणाऱ्यांचीही दक्षता मुख्यमंत्र्यांनी घेतली

शेतकऱ्यांच्या पंचांनाम्याबाबत कर्मचारी अधिकारी दुर्लक्ष करत असतील तर निश्चित त्याच्यावर कारवाई केली जाईल.शेतांमध्ये जाताना अडचणी आहे, ज्या ठिकाणी जाता येणार नाही त्या ठिकाणी ड्रोन सर्वे आणि सटेलाईट सर्वेने द्वारे रिपोर्ट एकत्रित केला जाईल. बोगस पंचनामे होणार नाही आणि सत्य लपवले जाणार नाही. एकही शेतकरी ज्याचं नुकसान झालं आहे तो वंचित राहणार नाही. कोणत्याही अधिकाऱ्याने पंचनामाबाबत भेदभाव आणी पक्षपात करत असेल आणी लोकांची अडवणूक करत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल
ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल ते मराठवाडा असो की विदर्भ असो, त्या ठिकाणी मी औपचारिक काही ठिकाणी जातं आहे. सध्या अधिवेशन सुरु आहे. तीन दिवस अधिवेशनाला सुट्टी असल्याने या तीन दिवसात तीन विभाग आणी सात जिल्हेचा दौरा घेतलेला आहे. शेतकरी जो हवालदिल झाला आहे त्यांना कुठंतरी त्याच्या बांद्यापर्यंत जाऊन त्याची अडचणी समजत आहे. यानुसार सोमवारी या संदर्भात मुख्यमंत्री यांना अहवाल सादर करणार आहे. लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पैशे कशे जाईल याबत प्रयत्न करेल असं अब्दूल सत्तार यांनी सांगितलं.