Ajit Pawar : शेतकऱ्याला उभं करायचच, पॅकेज जाहीर करताना अजितदादांचा ठाम निर्धार

Ajit Pawar : "एकूण राज्य सरकारच्यावतीने 31628 कोटींच पॅकेज देत आहोत. आपला प्रयत्न आहे की, जास्तीत जास्त पैसा दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न आहे. पीक नुकसानीचे पैसे, जखमी, मृत व्यक्तीचे सहाय्य 10 हजार रुपये दिले. राहिलेल्या गोष्टी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत"

Ajit Pawar : शेतकऱ्याला उभं करायचच, पॅकेज जाहीर करताना अजितदादांचा ठाम निर्धार
Mahayuti Govt
| Updated on: Oct 07, 2025 | 3:00 PM

काही दिवसांपूर्वी मराठवाडा आणि सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांची पिकं उद्धवस्त झाली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेली. जमीन खरडवून गेली. म्हणजे पुढची काही वर्ष पीक घेता येणार नाही अशी स्थिती आहे. अशा स्थितीत उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी मदत जाहीर केली आहे. “एकूण राज्य सरकारच्यावतीने 31628 कोटींच पॅकेज देत आहोत. आपला प्रयत्न आहे की, जास्तीत जास्त पैसा दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न आहे. पीक नुकसानीचे पैसे, जखमी, मृत व्यक्तीचे सहाय्य 10 हजार रुपये दिले. राहिलेल्या गोष्टी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पीक भरपाईसाठी 18 हजार कोटीपेक्षा जास्त इतिहासतली सर्वात जास्त पैसे देण्याचा निर्णय झाला आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 2 हेक्टर पुढे निर्णय घेतला आहे.शेतकऱ्याला उभं करायचच असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आपण हे पॅकेज जाहीर केलेलं आहे. खूप बारकाईने विचार केलाय.कुठलाही घटक वंचित राहणार नाही, याची काळजी राज्य सरकारने घेतली आहे. प्रत्येक ठिकाणी भौगोलिक परिस्थिती वेगळी असते. एखादं ठिकाण राहून गेलं असेल, तर त्याचा समावेश करण्याची तयारी ठेवली आहे” असं अजित पवार यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांवर अभूतपूर्व संकट आहे

“आम्ही तिघांनी बसून हा निर्णय केला. शेतकऱ्यांवर अभूतपूर्व संकट आहे. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीला लोक मदत करतायत. अनेक गोष्टी नियमांमध्ये कव्हर करता येत नाहीत. त्यावर सुद्धा सीएसआरच्या माध्यमातून आपल्याला कशी मदत करता येईस असा प्रयत्न आहे” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.