Weather Alert : विदर्भात गोंदिया गारठलं तर मुंबईत एप्रिलसारखी उष्णता

| Updated on: Jan 15, 2021 | 11:45 PM

राज्यात गोंदिया जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली असून गोंदिया जिल्ह्यात 6.8 डिग्री कमी तापमानाची नोंद झाली आहे.

Weather Alert : विदर्भात गोंदिया गारठलं तर मुंबईत एप्रिलसारखी उष्णता
प्रातिनिधीक फोटो (PTI25-11-2020_000018B)
Follow us on

गोंदिया : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सतत हवामानात बदल होत आहेत. आताही हवामानातील बदलामुळे काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी उष्णतेचं वातावरण आहे. राज्यात गोंदिया जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली असून गोंदिया जिल्ह्यात 6.8 डिग्री कमी तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा हा विदर्भात सर्वात थंड जिल्हा ठरला आहे. (Weather Alert Gondia in Vidarbha got colder while Mumbai is hotter)

मागील काही दिवसा आधी जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात तापमाना मध्ये वाढ झाली होती. मात्र, ढगाळ वातावरण संपल्या ने मागील तीन दिवसापासून तापमानात हळू हळू घट झाल्याने काळाच्या मध्यरात्रीपासून गोंदिया जिल्हा गारवा वाढला आहे. एका दिवसात 2.7 अंश सेल्शिअसने कमी झालं आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या वातावरणामध्ये मोठया प्रमाणात गारवा जाणवत आहे.

कालपासून थंडी मोठ्या प्रमाणात वाढ झाली असुन काल 6.8 डिग्री तापमाना झाल्याने गोंदिया जिल्हा हा विदर्भात सर्वात थंडा जिल्हा राहिला. त्याचप्रमाणे समोर दोन ते तीन दिवस अशीच थंडी कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे जिल्ह्यावासी कुड़कुडले आहेत. अनेक ठिकाणी शेकोटी पेटल्याचं चित्र दिसत आहे. गरम कपड्याचा वापरही वाढला आहे.

एककीडे विदर्भात गारवा जाणवत असला तरी मुंबईत पारा वाढत चालला आहे. मुंबईत मंगळवारी (12 जानेवारी) यावर्षातील सर्वाधिक 35.3 अश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर काल मुंबईत 30 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईत एप्रिलसारखी उष्णता

मुंबईत मंगळवारी (12 जानेवारी) यावर्षातील सर्वाधिक 35.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर बुधवारी तामपानात थोडी घट झाली. बुधवारी मुंबईचं तापमान 34.6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं. वर्षांच्या सुरुवातीच्या दोन आठवड्यातच तापमानात मोठी झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईकरांना जानेवारी महिन्यात एप्रिलच्या दाहकता सहन करावी लागत आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ स्टेशनवर बुधवारी सर्वोच्च 34.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जे सामान्यपासून जवळपास 4 अंश सेस्लिअस जास्त होतं.

आयएमडीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या मते, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात घट होते आणि हवेत रागवा जाणवतो. पण, यावर्षी हवेचं पॅटर्नमध्ये बदल झाला आहे. तेलंगणा आणि तामिळनाडूतील उष्ण हवेमुळे तापमानात वाढ होत आहे. तर येत्या दोन दिवसात रात्रीच्या वेळी तापमानात घट होऊन थंडी पडेल. (Weather Alert Gondia in Vidarbha got colder while Mumbai is hotter)

संबंधित बातम्या – 

Weather Alert | दिल्लीत हाडं गोठवणारी थंडी, मुंबईत पारा चढला, जानेवारीतच एप्रिलचा फील

कोकण, मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा ते विदर्भ, पाऊस पडणार की जाणार? या आठवड्यातील वातावरणाची डिटेल माहिती

Weather Report | हवेत गारवा, पण, पाऊस नाही; वाचा राज्याचं संपूर्ण ‘हवामान’

Weather Update : कोकणासह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाला सुरुवात, बळीराजा चिंतेत

(Weather Alert Gondia in Vidarbha got colder while Mumbai is hotter)