AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकण, मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा ते विदर्भ, पाऊस पडणार की जाणार? या आठवड्यातील वातावरणाची डिटेल माहिती

पावसाळा नसताना अचानक आलेला पाऊस आणखी काही दिवस मुक्काम ठोकून राहिल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे (Weather forecast of Maharashtra)

कोकण, मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा ते विदर्भ, पाऊस पडणार की जाणार? या आठवड्यातील वातावरणाची डिटेल माहिती
प्रतिकात्मक छायाचित्र
| Updated on: Jan 11, 2021 | 6:32 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. तर काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पडला. अनेक भागांमध्ये जवळपास आठवडाभर ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. पाऊस पडल्यानंतरही अनेक भागांमध्ये अद्यापही ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. त्यामुळे पावसाळा नसताना अचानक आलेला हा पाऊस आणखी काही दिवस मुक्काम ठोकून राहिल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. मात्र, आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे (Weather forecast of Maharashtra).

गेल्या आठवड्यात मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण गोवा क्षेत्र पावसामुळे जास्त प्रभावित झाले. मात्र, या आठवड्यात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे, असा अंदाज स्कायमीटर वेदरच्या तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या आठवड्यात कोकण-गोवा पासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वातावरण पूर्णपणे स्वच्छ असेल.

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

गेल्या आठवड्यात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागांमध्येही दिवसा आणि रात्रीदेखील तापमान 4 ते 8 अंश सेल्सिअसने वाढलं होतं. या भागांध्ये दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण-पूर्व दिशेने वारे वाहत होते. या वाऱ्यामध्ये आद्रतेची कमी होती. त्यामुळे तापमान वाढलं (Weather forecast of Maharashtra).

आता हवामानाचं रुप बदललं आहे. हवेचं देखील रुप बदलत आहे. उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशातील वारे मैदानी क्षेत्रांतून महाराष्ट्रात येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुरुवातीला राज्यातील उत्तरेकडील शहरांमध्ये थंडी वाढेल. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पालघर त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भात तापमान कमी होईल आणि थंडी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढच्या तीन दिवसात म्हणजेच 12, 13 आणि 14 जानेवारीला सामान्य तापमान होईल. तर काही भागांध्ये पारा खालीदेखील घसरण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान बदलामुळे कोकणात आंब्याचे पीकं प्रभावित होण्याची शक्यता आहे. या पिकांवर किड किंवा रोगाची शक्यता आहे, असं वेदर स्कायमीटरकडून वर्तवण्यात आलं आहे.

हेही वाचा : …तर पेट्रोल, डिझेलसह भाज्यांचेही दर वाढणार, जाणून घ्या कारण

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.