AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : कोकणासह अनेक जिल्ह्यांत पावसाला सुरुवात, बळीराजा चिंतेत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे.

Weather Update : कोकणासह अनेक जिल्ह्यांत पावसाला सुरुवात, बळीराजा चिंतेत
महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यंत अवकाळी पाऊस
| Edited By: | Updated on: Jan 09, 2021 | 9:09 PM
Share

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणासह, नाशिक आणि अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे. (heavy rain in sindhudurga konkan nashik maharashtra weather update)

फक्त सिंधुदुर्गच नाही तर नाशिक शहरातही पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी नाशिकमध्ये पाऊस सुरू आहे. अवेळी होत असलेल्या या पावसामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसण्याची भीती आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आहेत.

कुडाळ तालुक्याच्या कसाल, पडवे, रानबांबुळी आणि ओरोस परीसरात आज संध्याकाळी अचानक विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाने हजेरी लावली. गेले चार ते पाच दिवस जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे.  या पावसामुळे आंबा आणि काजू पिकावर परीणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथले शेतकरी चिंतेत आहेत.

ज्यात एकीकडे कोरोनाचं संकट अद्यापही कायम असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे. ऐन हिवाळ्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरणासह पावसाची रिपरिप सुरू आहे. आताही राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवला आहे. जवळपास तासभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले असून शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे.

खरंतर, गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. (Maharashtra Weather Alert About Rain). तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरीही बरसल्या. दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण तयार आहे. तर, मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. पावसाळी वातावरणामुळे राज्यातील थंडी अचानक गायब झाली आहे.

काही राज्यांमध्ये थंडीचा जोर ओसरला

मुंबईसह काही राज्यांमध्ये थंडीचा जोर ओसरला आहे. जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीच्या वाटेत कमी दाबाच्या क्षेत्रांचे आणि समुद्रातून येणाऱ्या बाष्पाचे अडथळे आले. त्यामुळेच उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट असतानाही राज्यातील रात्रीचे तापमान सरासरीखाली येऊ शकले नाही. कोकण ते उत्तर-मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्रातून बाष्प येत असल्याने थंडी पूर्णपणे गायब होऊन किमान तापमानात वाढ झाली आहे. (heavy rain in sindhudurga konkan nashik maharashtra weather update)

संबंधित बातम्या :

Weather Alert | मुंबई, पुणे, कोकण, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज, पावसामुळे थंडी गायब

Weather Alert | राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी, काढणीला आलेल्या पिकांवर संकट

(heavy rain in sindhudurga konkan nashik maharashtra weather update)

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल