AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून पत्नी सुनेत्रा मुंबईतून निघून आली : अजित पवार

 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची आज बारामतीत जंगी मिरवणूक काढण्यात आली. विधानसभा निवडणुकीतील विजय आणि उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर बारामतीकरांनी अजित पवारांच्या भव्य सत्काराचं आयोजन केलं.

...म्हणून पत्नी सुनेत्रा मुंबईतून निघून आली : अजित पवार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jan 10, 2020 | 7:08 PM
Share

बारामती :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची आज बारामतीत जंगी मिरवणूक काढण्यात आली. विधानसभा निवडणुकीतील विजय आणि उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर बारामतीकरांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar Sunetra Pawar) भव्य सत्काराचं आयोजन केलं. यावेळी अजित पवारांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.  भव्य मिरवणुकीनंतर अजित पवारांनी(Ajit Pawar Sunetra Pawar) सत्काराला उत्तर देणारं भाषण केलं.

आजचा सत्कार हा आगळा वेगळा आहे. हा सत्कार माझा नाही तर बारामतीकरांचा आहे. आजच्या मिरवणुकीमुळे खूप आठवणी डोळ्यासमोरून गेल्या. माझे शाळेचे मित्र आज भेटले, असं अजित पवार म्हणाले. 16 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीत येणार आहेत. कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार असल्याची माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.

जनतेने जनतेचं काम केलं, आता आपलं काम

ज्यांनी मला प्रचंड मतदान केलं, एवढं प्रेम दिलं त्या बारामतीकरांचा हा सत्कार आहे. मात्र आता काम करायचं आहे. गेल्या पाच वर्षात काम करता आले नाही. शहरासोबत जिल्ह्याची जबाबदारी आहे. जनतेनं जनतेचं काम केलं आहे. आता आपलं काम आहे. पाण्याचा प्रश्न आहे, तो सोडवायचा आहे, असं अजित पवार म्हणाले.

चार दिवस सासूचे असतात तसेच सुनेचेही चार दिवस येतात,  विश्वासाला तडा जाऊ न देण्याचं काम आपल्याला करावे लागेल.  दोन लाखांच्या पुढील कर्जदारांसाठी आम्ही काहीतरी करणार आहोत. बारामतीतील पोलीस कॉलनीतील घरं चांगली केली जाणार आहेत. 500 चौ. फूट जागा आता पोलिसांना देणार, असं अजित पवारांनी सांगितलं.

सुनेत्रा मुंबईतून निघून आली

यावेळी अजित पवारांनी बारामतीकरांना मुंबईला येऊ नका असा सल्ला दिला. जर मुंबईत होणारं कामं असेल तरच या. अन्यथा कोणीतरी येतो आणि म्हणतो सहजच आलो होतो, असं करु नका. मुंबईला येताना मुंबईची काम घेऊन या, सहज भेटायला येऊ नका. अजून सरकारी घर मिळालं नाही. मुंबईत छोटी घरं असतात, डायनिंग,  किचन, बेडरूममध्ये लोकांना बसवावं लागतं. पत्नी सुनेत्रा तर मुंबईतून निघून आली, जोपर्यंत घर भेटत नाही तोपर्यंत येत नाही म्हटलं, असं अजित पवार म्हणताच, उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला.

Follow Us
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...