यंदा दिवाळीत फटाके फुटणार का? सुप्रीम कोर्टातून सर्वात मोठी बातमी, मोठा निर्णय

दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी होते. प्रचंड आवाज करणारे फटाके फोडले जातात. यामुळे ध्वनी प्रदूष आणि वायू प्रदूष होते. या पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयातून मोठी बातमी समोर आली आहे.

यंदा दिवाळीत फटाके फुटणार का? सुप्रीम कोर्टातून सर्वात मोठी बातमी, मोठा निर्णय
न्यायालयाचा मोठा निर्णय
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 30, 2026 | 3:25 PM

दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. जवळपास पंधरा दिवस संपूर्ण देशभरात दिवाळीची धामधूम सुरू असते. या काळात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून सातत्याने एक मुद्दा पुढे येत आहे. तो म्हणजे फटाक्यांमुळे होणारं ध्वनी आणि वायू प्रदूषण या काळात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. अनेकजण मोठे आवाज करणारे फटाके फोडतात. यामुळे प्रदूषणाच्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे फटाके फोडण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी देखील अनेकांकडून होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे फटाक्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. दिवाळी सणाच्या काळात फटाके वाजवण्यावर सुप्रीम कोर्टाकडून पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली नाहीये.  मात्र फटाके फोडताना वेळेचं बंधन पाळा असं न्यायालयाने म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टाने नेमकं काय म्हटलं?  

Loading...

आगामी दिवाळीच्या सणात फटाके वाजवण्यावर संपूर्ण देशात पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पर्यावरण आणि प्रदूषण नियमांचा समतोल राखत, न्यायालयाने दिवाळीदरम्यान फटाके फोडण्यासाठी वेळेचे निश्चित बंधन पाळण्याचे संकेत दिले आहेत. फटाक्यांच्या उत्पादनावर आणि वापरावर पूर्णपणे रोख लावण्याऐवजी हिरवे फटाके आणि वेळेच्या मर्यादांचे पालन करून उत्सव साजरा करता येऊ शकतो, अशी भूमिका पीठाने मांडली आहे. या निर्णयामुळे दिवाळीच्या सणात नियम आणि अटींच्या अधीन राहून फटाके फोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमधील महत्त्वाचे मुद्दे 

सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाके वाजवण्यावर देशव्यापी पूर्ण बंदी घालण्यास स्पष्ट नकार दिला.

पर्यावरण संरक्षण आणि परंपरांचा समतोल राखण्यासाठी फटाक्यांसाठी वेळेचे बंधन घालण्याचे संकेत दिले.

फटाक्यांवर पूर्ण बंदी घालणे व्यवहार्य नसून हिरव्या (Green Firecrackers) फटाक्यांच्या वापरावर भर देण्यात आला आहे.

प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेच्या मर्यादांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सणाच्या काळात नागरिक नियमांच्या अधीन राहून फटाके फोडू शकणार आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us