एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय गायकवाड मोठ्या अडचणीत, थेट महिलेची तक्रार, गुन्हा दाखल..
आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. श्वेता महाले यांच्याबद्दल केलेले विधान चांगलेच भोवताना दिसत आहे. आता वाद वाढण्याची शक्यता आहे.

आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. संजय गायकवाड यांच्या विरोधात एका महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. बुलढाणा पोलिसांत आमदार गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. बाप तो बाप रहेगा , विषय पेटल्याचे बघायला मिळतंय. वाद काही कमी होत नाही तर उलट वाढत आहे. आमदार गायकवाड यांनी आमदार महाले बाप तो बाप रहेगा, या गाण्यावर थिरकल्या, प्रश्न विचारला होता. यावर आमदार गायकवाड माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, बाप तो बाप रहेगा हे माणसाने बोललेले बरं. पण एखाद्या बाईने म्हटले की बाप आहे… तर बाई बापासारखे शरीर कुठून आणणार आहे.
गेल्या आठवड्यात चिखली मतदार संघाच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांचा वाढदिवस मित्रपरिवाराने बुलढाणा शहरात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला.. यावेळी एक रॅली काढण्यात आली होती त्या रॅलीत “बाप तो बाप रहेगा….” अशा प्रकारे गाणेही वाजवण्यात आले होते.. या गाण्यावर प्रसारमाध्यमांनी आमदार गायकवाड यांची प्रतिक्रिया घेतली असता गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, ” बाप तो बाप है , he ठीक आहे. मात्र हे विधान एखाद्या पुरुषाने केलं तर चालेल मात्र एखाद्या बाईने म्हटलं बाप तो बाप आहे तर बापाचं शरीर आणणार कुठून..? ”
असा सवाल उपस्थित केला होता. . हे विधान समाज माध्यमात व प्रसार माध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. या विधानावर महिलांच्या लज्जेस धक्का पोहोचला असून महिलांच्या शरीर ठेवणीवर प्रहार करण्यात आला आहे, असा आरोप करत संजय गायकवाड यांनी हे विधान हेतू पुरस्कर केल्याचं तक्रार करत एका 42 वर्षीय महिलेने आमदार गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मध्यरात्री गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
मात्र, आमदार संजय गायकवाड यांनी थेट म्हटले होते की, बाप तो बाप रहेगा हे माणसाने बोललेले बरं. पण एखाद्या बाईने म्हटले की बाप आहे… बाई बापासारखे शरीर कुठून आणणार? यावरूनच त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. महिलांच्या मनास लज्जा वाटेल असे हातवारे आमदार संजय गायकवाड यांनी केल्याचे महिलेचे म्हणणे आहे.
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी BNS कलम 79 नुसार केला गुन्हा दाखल केला. आता संजय गायकवाड यावर नक्की काय प्रतिक्रिया देतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, महाले आणि गायकवाड यांच्यातील वाद टोकाला पोहोचताना दिसत आहे. यामध्ये आता वरिष्ठ नेते हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे. वाद पेटताना दिसतोय.