Menstrual Hygiene Day : 15 ऑगस्ट पासून एक रुपयामध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन…..

| Updated on: May 28, 2022 | 5:50 PM

मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिनचा वापर हा शहरी भागात होतो. ज्यामुळे शहरात महिलांच्या आरोग्याशी निगडीत प्रश्न हे कमी प्रमाणावर उद्भवतात. मात्र ग्रामीण भागात मासिक पाळी असो की सॅनिटरी नॅपकिन हे शब्द ही उच्चारले जात नाहीत.

Menstrual Hygiene Day : 15 ऑगस्ट पासून एक रुपयामध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन.....
सॅनिटरी नॅपकिन
Image Credit source: tv9
Follow us on

कोल्हापूर – स्त्री अथवा मुली यांना देवाने वर्दान दिले आहे ते ममत्वाचे. आणि ममत्वाचा थेट संबंध आहे तो मासिक पाळीशी. त्यामुळे मासिक पाळीचा (Menstruation) संबंधीत गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्यामुळे प्रत्येक कुटुंब हे आपल्या घरातील त्या सदस्याची त्या दिवसात काळजी घेतोच. तसेच मासिक पाळीचा हा संबंध स्त्रीच्या आरोग्याशी निगडित असतो. त्यामुळे स्त्रीने प्रत्येक मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक असते. महाराष्ट्रात याचे प्रमाण सुधारत असले तरी 26 टक्के महिलांचे प्रमाण असे आहे ज्या मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकिनचा वापर करत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मासिक पाळी स्वच्छता दिनी (Menstrual Hygiene Day) महिलांसाठी महाराष्ट्र शासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बचत गटाच्या महिला आणि दारिद्र्यरेषेखाली गटात येणाऱ्या महिलांना 1 रुपयांमध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे सुमारे 60 लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल शासनाने उचलले आहे. ही योजना 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू होईल असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी सांगितले आहे. त्यांनी ही घोषणा कोल्हापूरमध्ये केली. ते पत्रकारांशी बोलत होते.

ग्रामीण महिलांसाठी योजना

मासिक पाळीत सॅनिटरी नॅपकिनचा वापर हा शहरी भागात होतो. ज्यामुळे शहरात महिलांच्या आरोग्याशी निगडीत प्रश्न हे कमी प्रमाणावर उद्भवतात. मात्र ग्रामीण भागात मासिक पाळी असो की सॅनिटरी नॅपकिन हे शब्द ही उच्चारले जात नाहीत. आज ही ग्रामिण भागात मासिक पाळीत कापड वापरले जाते. ज्यामुळे तेथील महिलांच्या समोर आरोग्याशी निगडीत प्रश्न उद्भवताना दिसत आहेत. तर योग्य माहिती न मिळाल्याने तर मासिक पाळीच्या वेळी काळजी न घेतल्याने जगभरातील आठ लाख महिलांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे पाहता राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील महिलांच्या आरोग्यासाठी विचार केला. त्याप्रमाणे शासनाने महाराष्ट्र राज्यातील दारिद्र रेषेखालील महिलांसाठी नाममात्र रुपयांमध्ये मासिक पाळी स्वच्छता दिनी 1 रुपयांमध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन देण्याची योजना आखली आहे. तसेच ही नवीन योजना ग्रामविकास खात्याकडून राबवण्यात येणार आहे, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

जगातील व राज्यातील आकडेवारी –

भारतात दरवर्षी 120 दशलक्षाहून अधिक महिलांना मासिक पाळीचा त्रास आणि आजारांचा सामना करावा लागतो. भारतात तीनशे वीस दशलक्ष मासिक पाळी होणाऱ्या महिला स्त्रियांपैकी केवळ 12 टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात असे आकड्यावरून समोर आले आहे. यामुळे देशात गर्भाशयाच्या कर्करोगामुळे झालेल्या 60,000 महिलांच्या मृत्यू पैकी दोन तृतीयांश मृत्यू मासिक पाळीती वैरसमजूतीमुळे झाला आहे. तर राज्याचा विचार केल्यास येथे केवळ 66 टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात. ज्यात शहरी भागाचे प्रमाण जास्त आहे. तर ग्रामिण भागात याचे प्रमाण कमी असून ते 17.30 टक्के आहे.

दारिद्र रेषेखालील 19 वर्षावरील सर्व महिलांसाठी योजना

राज्यात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेत फक्त 19 वर्षाखालील युवतींना सहा रुपयात सहा सॅनिटरी नॅपकिन्स देण्यात येत आहेत. त्यामुळे सध्या दारिद्र रेषेखालील मुलींना त्याचाल फायदा होत आहे. मात्र याचा लाभ महिलांना होताना दिसत नाही. त्यामुळे मुलींप्रमाणेच महिलांनाही या योजनेचा लाभ व्हावा सॅनिटरी नॅपकिन्स संदर्भात जागृकता यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ग्राम विकास विभागामार्फत दारिद्र्यरेषेखालील सर्व युवती, महिला आणि बचत गटांमधील महिलांना एक रुपये 10 सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार आहे. तर या योजनेसाठी 200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये –

  1. राज्यातील ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील सर्व वयोगटातील युवती व महिलांना दर महिना एक रुपये नाममात्र शुल्कात 10 सॅनिटरी नॅपकिन असलेले एक पाकीट महिलांना मिळणार.
  2. स्थानिक पातळीवर गाव स्तरावरच गावातील ग्राम संघामार्फत महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिले जाणार.
  3. शासन स्तरावर दर करार करण्यात येणार.
  4. योजनेअंतर्गत महिलांना सॅनिटरी नेपक किट चा वापर करण्याबाबत वैयक्तिक स्वच्छते संदर्भात जागृती व प्रचार करणार
  5. सॅनिटरी नॅपकिन व्यवस्थापन व विल्हेवाट
  6. योजनेत जवळपास 60 लाख पेक्षा जास्त लाभार्थी महिला असल्याने सॅनिटरी नाक्यांचे विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक गाव स्तरावर मशीन बसवण्यात येणार आहे. या मशीन मार्फत महिलांनी सॅनिटरी नॅपकिन ची विल्हेवाट लावावी यासाठी जनजागृतीही करण्यात येणार आहेत. ही सर्व मशीन जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या स्वनिधीतून तसेच शासकीय निधी देणग्या तसेच सीएसआर निधीच्या माध्यमातून बसविण्यात येणार