Corona update : दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; 15 दिवसांमध्ये प्रादुर्भाव दुप्पटीने वाढला, राजधानी लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?

Corona update : दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ; 15 दिवसांमध्ये प्रादुर्भाव दुप्पटीने वाढला, राजधानी लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
Image Credit source: TV9

दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या सात दिवसांपासून दररोज एक हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत असल्याने चिंता वाढली आहे.

अजय देशपांडे

|

Apr 29, 2022 | 12:43 PM

दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते, गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा एकदा ज्या पद्धतीने कोरोनाचे रुग्ण वाढतआहेत, ते पहाता कोरोनाची (Corona) चौथी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशभरात गेल्या 24 तासांमध्ये 3,377 नव्या कोरोना रुग्णांची (Corona patient) नोंद झाली आहे तर एकूण 60 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये (Delhi) कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव पहायला मिळत असून, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 1,490 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झालाय. कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर 4.62 टक्क्यांवर पोहोचला आहे. याबाबत दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी जनतेला दिलासा देताना म्हटले आहे की, सध्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, मात्र परिस्थिती गंभीर नसल्याने घाबरण्याचे कारण नाही.

ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव

दिल्लीमध्ये जे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत, त्यांतीन अनेक रुग्णांना कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग हा कोरोनाच्या इतर व्हेरियंट पेक्षा अधिक आहे. मात्र इतर व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्रॉनचे लक्षणे हे सौम्य आहेत. दिल्लीमध्ये गेल्या सात दिवसांमध्ये दररोज सरासरी एक हजारांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. तर गेल्या पंधरा दिवसांत कोरोनाच्या प्रादुर्भावाचा दर दुप्पट झाला आहे. गेल्या 14 एप्रिल रोजी दिल्लीमध्ये कोरोना वाढीचा दर हा 2.39 टक्के होता तर 28 एप्रिल रोजी तो 4.67 वर पोहोचला आहे. त्यामुळे दिल्लीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

दिल्लीमध्ये लॉकडाऊन लागणार ?

देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात 3,377 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 1,490 रुग्ण एकट्या दिल्लीमध्ये आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दिल्लीमध्ये रुग्ण वाढीचा दर देखील पंधरा दिवसांत दुप्पट झाला आहे. 14 एप्रिल रोजी दिल्लीमध्ये कोरोना वाढीचा दर हा 2.39 टक्के होता तर 28 एप्रिल रोजी तो 4.67 वर पोहोचला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार जर प्रादुर्भावाचा दर हा 5 टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर परिस्थिती चिंताजनक असते. त्यामुळे कोरोनाला आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा दिल्लीकरांवर निर्बंध लादण्यात येणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें