AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jumme ki namaz in Uttar Pradesh: योगींनी भोंगे उतरवले, आता उत्तर प्रदेशात रस्त्यावर नमाज होणार नाही; रामपूरमधील परंपरा तुटण्यामागचे कारण काय?

Jumme ki namaz in Uttar Pradesh: उत्तर प्रदेशात 19949 मशिदीत नमाज पठण केलं जाणार आहे.

Jumme ki namaz in Uttar Pradesh: योगींनी भोंगे उतरवले, आता उत्तर प्रदेशात रस्त्यावर नमाज होणार नाही; रामपूरमधील परंपरा तुटण्यामागचे कारण काय?
आता उत्तर प्रदेशात रस्त्यावर नमाज होणार नाही; रामपूरमधील परंपरा तुटण्यामागचे कारण काय?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 29, 2022 | 12:27 PM
Share

लखनऊ: देशभरात आज ईदच्या आधी अलविदाची नमाज अदा (Jumme ki namaz) केली जाणार आहे. या नमाजासाठी उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र यावेळी रस्तावर नमाज अदा केली जाणार नाही. नमाजींनी मशिदीच्या आतच नमाज पठण करावी. नमाजींमुळे ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाने मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. यावेळी मशिदीतच नमाज अदा केली जाणार आहे. धर्मगुरुंशी चर्चा झाली आहे, असं प्रशांत कुमार यांनी सांगितलं. एकीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (cm yogi aadityanath) यांनी राज्यातील भोंगे उतरवण्याचे काम सुरू केलं आहे. तर दुसरीकडे रस्त्याऐवजी मशिदीत नमाज पठण केलं जात आहे. त्यामुळे योगींच्या निर्णयाशी या कृतीला जोडून पाहिले जात आहे.

अलविदाच्या नमाजबाबत पोलिसांनी सर्व धर्मगुरुंशी चर्चा केली आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अलविदा नमसाजसाठी पोलिसांनी 31151 स्थळं ठरवली आहेत. या ठिकाणी 46 कंपनी पीएसीसह 7 सीएपीएफ तैनात ठेवण्यात येणार आहेत. ही सर्व 2705 ठिकाणे संवेदनशील असल्याचं सांगितलं जात आहे.

29 हजार 806 धर्मगुरुंशी चर्चा

उत्तर प्रदेशात 19949 मशिदीत नमाज पठण केलं जाणार आहे. त्यासाठी 29 हजार 806 धर्मगुरुंशी चर्चा झाली आहे. अलविदा नमाज पठणा दरम्यान लाऊडस्पीकरच्या नियमांचं पालन करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सध्या राज्यातून 21 हजार 965 लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत. तर 42 हजार 332 लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला आहे.

मार्गदर्शक सूचना काय?

अलविदा नमाजाबाबत इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नमाजींना मशिदीतच नमाज पठण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नमाजींमुळे ट्रॅफिक जाम होऊ नये. तसेच मशीद समित्यांनी लाऊडस्पीकरच्या नियमांचं पालन करावं, असं आवाहनही या मार्गदर्शक सूचनातून करण्यात आलं आहे.

दुसऱ्या मशिदीत जा

मशिदीतील नमाज पठण करण्याची क्षमता संपत असेल तर दुसऱ्या मशिदीत जाऊन नमाज पठण करा. तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसारच लाऊडस्पीकरचाही आवाज ठेवावा, असं आवाहन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना खालिद रशीद फिरंगी यांनी केलं आहे.

रामपूरमध्ये पंरपरा तुटली

रामपूरमध्ये अलविदा नमाज म्हणजे एक ऐतिहासिक सोहळा असतो. स्वातंत्र्यापूर्वीपासून रामपूर जिल्ह्यातील लोक शहरातील जामा मशिदीत नमाज पठणासाठी येत होते. लाखो लोक यावेळी नमाज पठण करायचे. अनेक किलोमीटरपर्यंत ही नमाज पठण केली जायची. रस्ते, दुकानांच्या छतावर आणि दुकानातही नमाज पठण केली जायची. त्यामुळे आता पहिल्यांदाच ही परंपरा खंडित होणार आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.