Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, 5 दिवसांत सोने 3500 रुपयांनी स्वस्त

| Updated on: Mar 15, 2022 | 2:05 PM

गेल्या आठवड्यात 2,070.44 डॉलरवर पोहचल्यनंतर स्पॉट गोल्ड 0.4 टक्क्यांनी घसरून 1,943.09 डॉलर प्रति औंसवर आले. चीननंतर भारत हा सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार आहे. सोन्याचा वापर प्रामुख्याने दागिने उद्योगाच्या गरजा भागविण्यासाठी केला जातो. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत (एप्रिल-फेब्रुवारी) देशातील सोने आयात 73 टक्क्यांनी वाढून 45.1 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण, 5 दिवसांत सोने 3500 रुपयांनी स्वस्त
सोन्याच्या दरात वाढ
Follow us on

देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या (Gold-Silver) दरात घसरण सुरूच आहे. मंगळवारी सोन्यात 0.50 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX Gold) एप्रिलच्या वायदा बाजारासाठी सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 1.31 टक्के घसरण झाली. चांदीचा भाव 1.30 टक्क्यांनी घसरला. भारतात सध्या विक्रीच्या सत्रापूर्वी गेल्या आठवड्यात सोने प्रति 10 ग्रॅम 55,600 रुपयांवर पोहोचले. गेल्या आठवड्यात 2,070.44 डॉलरवर गेल्यानंतर स्पॉट गोल्ड 0.4 टक्क्यांनी घसरून 1,943.09 डॉलर प्रति औंसवर आले. फेडरल रिझर्व्हच्या (Federal Reserve Bank) बैठकीपूर्वी रोख्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याने जागतिक बाजारात सोन्याच्या दरावर दबाव होता. धोरण आखणारे फेडच्या बैठकीत व्याजदर वाढवू शकतात. रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला आणि वाढत्या महागाईमुळे गेल्या आठवड्यात सोने आतापर्यंतच्या उच्चांकी पातळी जवळ पोहोचले होते. महागाईच्या दरात वाढ झाल्याने सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांची चाचपणी सुरू आहे.

15 मार्च 2022 रोजीचे सोन्या-चांदीचा भाव

मंगळवारी एमसीएक्सवर एप्रिल वायदा बाजारातील सोन्याचा भाव 684 रुपये म्हणजेच 1.25 टक्क्यांनी घसरून 51,620 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. त्याचवेळी मे वायदे चांदीचा भाव झपाट्याने घसरला आणि 893 रुपयांनी घसरून 67,951 रुपये प्रति किलो झाला. जागतिक इक्विटी बाजारांनी उसळी घेतली आणि सराफा बाजारावरही दबाव आणला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची दोन दिवसांची धोरणात्मक बैठक आजपासून सुरू होत असून या बैठकीत यूएस फेड व्याजदरात वाढ करू शकते, यावर बाजाराचे एकमत आहे.

11 महिन्यांत सोन्याची आयात 4,500 कोटी डॉलरवर

चीननंतर भारत हा सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार आहे. सोन्याचा वापर प्रामुख्याने दागिने उद्योगाच्या गरजा भागविण्यासाठी केला जातो. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत (एप्रिल-फेब्रुवारी) देशातील सोने आयात 73 टक्क्यांनी वाढून 45.1 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2022 मध्ये या सोन्याची आयात मात्र 11.45 टक्क्यांनी घटून 4.7 अब्ज डॉलरवर आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत सोन्याची आयात वाढल्याने देशाची व्यापार तूटही वाढली आहे. 2021-22 च्या पहिल्या 11 महिन्यांत व्यापार तूट वाढून 176 अब्ज डॉलरवर पोहचली आहे, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 89 अब्ज डॉलर होती.

2021 मध्ये सोन्याच्या आयातीत मोठी वाढ

कोविड-19 महामारीमुळे 2020 मध्ये भारताची सोन्याची आयात 430.11 टनांवरून 2021 मध्ये 1,067.72 टन झाली. स्वित्झर्लंडने सर्वाधिक 469.66 टन सोने आयात केले. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीकडून (UAE) 120.16 टन, दक्षिण आफ्रिकेतून 71.68 टन आणि गिनीकडून 58.72 टनांचा समावेश आहे.