AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhanteras 2021: सोने खरेदी करताना आवर्जून ‘हा’ नियम लक्षात ठेवा नाहीतर धनत्रयोदशीला पोलिस येतील घरी!

आज धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी लोक सोने खरेदी करतात. काही लोक सोन्याचे दागिने देखील खरेदी करतात. बरेच लोक कर्ज गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करतात. दागिन्यांव्यतिरिक्त, कर्ज सोन्याची नाणी, डिजिटल सोने इत्यादींमध्ये देखील गुंतवणूक करतात.

Dhanteras 2021: सोने खरेदी करताना आवर्जून 'हा' नियम लक्षात ठेवा नाहीतर धनत्रयोदशीला पोलिस येतील घरी!
सोने खरेदी
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 9:42 AM
Share

मुंबई : आज धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी लोक सोने खरेदी करतात. काही लोक सोन्याचे दागिने देखील खरेदी करतात. बरेच लोक कर्ज गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करतात. दागिन्यांव्यतिरिक्त, सोन्याची नाणी, डिजिटल सोने इत्यादींमध्ये देखील गुंतवणूक करतात. मात्र, घरात किती सोने ठेवता येईल असा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

जास्तीत जास्त किती सोने ठेवू शकता?

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) सोने ठेवण्यासाठी मर्यादा निश्चित केलेली आहे. या मर्यादेतील सोने व्यक्तीच्या घराच्या झडतीच्या वेळी जप्त केले जाणार नाही. विवाहित महिला जास्तीत जास्त 500 ग्रॅम सोने ठेवू शकतात. तर अविवाहित महिलेला जास्तीत जास्त 250 ग्रॅम सोने ठेवण्याची परवानगी आहे. एक माणूस आपल्या घरात जास्तीत जास्त 100 ग्रॅम सोने ठेवू शकतो.

1 डिसेंबर 2016 रोजीच्या CBDT च्या प्रेस रिलीझमध्ये असे म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीकडे असलेल्या सोन्याचे दागिने किंवा दागिन्यांच्या रकमेवर मर्यादा नाही, जर ते स्पष्ट करता येतील अशा स्त्रोतांकडून खरेदी केले गेले असतील. यामध्ये मृत्युपत्राचा समावेश आहे. त्यामुळे आयकर कायदा एखाद्या व्यक्तीकडे सोने आणि दागिने ठेवण्यावर कोणतीही मर्यादा घालत नाही. परंतु तुम्हाला तुमच्या सोन्याचे स्त्रोत स्पष्ट करावे लागतील.

घरात मर्यादेपेक्षा जास्त सोने ठेवले तर काय होईल?

जर एखाद्या व्यक्तीने या मर्यादेपेक्षा जास्त सोने घरात ठेवले असेल. तर त्यांना त्या सोन्यामागील उत्पन्नाचा स्रोत सांगावा लागेल. जर सोने मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्या व्यक्तीला उत्पन्नाचा स्रोत, गुंतवणुकीचा पुरावा तयार ठेवावा लागतो. ज्याच्या मदतीने तुम्ही आयकर रिटर्नमध्ये गुंतवणुकीचा स्रोत सांगू शकता. भेटवस्तूंमध्ये मिळालेल्या सोन्यासाठी तुम्हाला कोणता पुरावा ठेवावा लागेल हे तुम्हाला टॅक्स इनव्हॉइसबद्दल समजून घ्यावे लागेल. यासाठी तुम्हाला भेट पावती ठेवावी लागेल.

संबंधित बातम्या : 

Gold Rate Today: धनत्रयोदशीपूर्वीच मोठी बातमी! सोने स्वस्त; तोळ्याचा भाव काय?

स्वप्नांच्या शहरात स्वप्नातलं घर, गोरेगावात एकूण 787 कोटींचे फ्लॅट्सही विक्री, लॅविश लाईफ, हायप्रोफाईल सुविधांना प्रचंड प्रतिसाद

ऑक्टोबर 2021 मध्ये GST संकलन पुन्हा 1.3 लाख कोटींच्या पुढे, 24 टक्क्यांनी वाढ

(Remember these rules when buying gold to Dhanteras)

Follow Us
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?