कसा आहे 'इक्कीस तारीख शुभ मुहूर्त'?

मुंबई: अभिनेता संजय मिश्राने गेल्या अनेक सिनेमातून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मसान, आंखों देखी, कडवी हवा, अंग्रेजी में कहते है यासारख्या अनेक सिनेमातून संजय मिश्राने आपण सिद्धहस्त अभिनेता असल्याचं दाखवून दिलं आहे.  दिग्दर्शक पवन चौहानचा ‘इक्कीस तारीख शुभ मुहूर्त’ हा सिनेमाही  याच पठडीतला सिनेमा आहे. या सिनेमात संजय मिश्राने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची ताकद …

कसा आहे 'इक्कीस तारीख शुभ मुहूर्त'?

मुंबई: अभिनेता संजय मिश्राने गेल्या अनेक सिनेमातून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मसान, आंखों देखी, कडवी हवा, अंग्रेजी में कहते है यासारख्या अनेक सिनेमातून संजय मिश्राने आपण सिद्धहस्त अभिनेता असल्याचं दाखवून दिलं आहे.  दिग्दर्शक पवन चौहानचा ‘इक्कीस तारीख शुभ मुहूर्त’ हा सिनेमाही  याच पठडीतला सिनेमा आहे. या सिनेमात संजय मिश्राने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची ताकद दाखवली आहे. मात्र सिनेमाची कहाणी आणि संवाद हे तितकेसे तगडे दिसत नाहीत.

एका लग्नाभोवती या सिनेमाचं कथानक आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात एखादं लग्न असेल तर काय-काय तडजोडी केल्या जातात, त्यावर या सिनेमातून भाष्य करण्यात आलं आहे.

मधुरेतील पंडित गिरीधरलाल शर्मा (संजय मिश्रा) आपली मुलगी राधा (काजल जैन) आणि आयएएसची तयारी करणारा मुलगा बनवारी (चंद्रचूड राय) यांच्यासोबत राहतात. राधा शहरातीलच दुकानदार गोपालच्या (महेश शर्मा) प्रेमात पडते. त्यांच्या प्रेमप्रकरणाला लग्नात रुपांतरित करण्यासाठी मुहूर्त काढला जातो, जो त्याच महिन्याच्या 21 तारखेचा असतो. ‘इक्कीस तारीख शुभ मुहूर्त’ हे सिनेमाचं नाव  का असेल यावरुन समजू शकेल.

लग्नाची तारीख ठरली असली तरी मुलीच्या वडिलांना टेन्शन असतं खर्चाचं. त्यावेळी पंडित गिरीधरलाल यांना त्यांचा मित्र बुलाकी (बृजेंद्र काला) एक आयडिया सुचवतो. मुलीच्या लग्नावेळीच मुलाचाही बार उडवा, ज्यामुळे हुंडा येईल, त्यातून मुलीचे हात पिवळे करता येतील.

या कल्पनेनंतर पंडित आणि त्यांचा मित्र बुलाकी हे दोघे मुलगा बनवारीसाठी मुलगी शोधायला लागतात.

अभिनया बाबतीत संजय मिश्राने आपली भूमिका योग्यप्रकारे बजावली आहे. मात्र विस्कळीत कहाणीमुळे सिनेमा भरकटला. मध्येच कॉमेडी करण्याच्या प्रयत्न फसले आहेत.

या सिनेमाला मिळतात 2 स्टार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *