RAW Movie Review : जॉनचा दमदार अभिनय, पण कमकुवत कथानक

हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत हेरगिरीवर आधारित आतापर्यंत अनेक चित्रपट आले आहेत. प्रत्येक सिनेमात वेगवेगळे पैलू दाखवण्याचा प्रयत्न निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. बॉक्स ऑफिसवर हमखास यश मिळवायचं असेल तर या विषयाला निर्मात्यांकडून पसंती दिली जातेच. या विषयावरील चित्रपटही कोटीच्या कोटी उड्डाणे घेतात. त्यामुळेच निर्मात्यांना नेहमीच हा विषय भुरळ घालतो. अभिनेता जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला आणि रॉबी ग्रेवॉल दिग्दर्शित रॉ […]

RAW Movie Review : जॉनचा दमदार अभिनय, पण कमकुवत कथानक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत हेरगिरीवर आधारित आतापर्यंत अनेक चित्रपट आले आहेत. प्रत्येक सिनेमात वेगवेगळे पैलू दाखवण्याचा प्रयत्न निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. बॉक्स ऑफिसवर हमखास यश मिळवायचं असेल तर या विषयाला निर्मात्यांकडून पसंती दिली जातेच. या विषयावरील चित्रपटही कोटीच्या कोटी उड्डाणे घेतात. त्यामुळेच निर्मात्यांना नेहमीच हा विषय भुरळ घालतो. अभिनेता जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असलेला आणि रॉबी ग्रेवॉल दिग्दर्शित रॉ अर्थात ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ हा चित्रपटही त्याच पठडीतला आहे. पण बऱ्याच पातळ्यांवर हा चित्रपट निराश करतो. हेरगिरीवर आधारित चित्रपटांना गती हवी. पण या चित्रपटाची गती प्रचंड संथ आहे आणि हाच या चित्रपटाचा सगळयात कमकुवत दुवा आहे.

‘रोमिओ, अकबर  वॉल्टर’ चित्रपटाची कथा आधी फ्लॅशबॅकमध्ये उलगडत जाते. यामध्ये रोमिओचा अकबर कसा होतो हे दाखवण्यात आलं आहे. रोमिओ बँकेत नोकरी करत सर्वसामान्य जीवन व्यतीत करत असतो. त्याचे वडील रॉचे एजंट असतात आणि त्यांनी देशासाठी आपलं बलिदान दिलेलं असतं. रोमिओच्या आईला मात्र त्याने सर्वसामान्य जीवन जगावं वाटत असतं. रॉचा चीफ श्रीकांत रॉयची मात्र रोमिओवर नजर असते.

एक दिवस अशी काही घटना घडते रोमिओला रॉमध्ये आणण्यात श्रीकांत रॉय यशस्वी ठरतो. एका खास मिशनसाठी रोमिओला पाकिस्तानमध्ये अकबर म्हणून पाठवलं जातं. मोठ्या शिताफीने अकबरही आपलं काम चोख बजावतो. पण पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑफिसर खुदाबख्शला अकबरवर संशय बळावतो आणि त्याला तो आपल्या जाळ्यात अडकवतो. आता ते सिक्रेट मिशन नेमकं काय? अकबरला खुदाबक्श कसा अडकवतो? अकबर आपलं मिशन पूर्ण करतो का? अकबरचा वॉल्टर खान कसा होतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला ‘रोमिओ, अकबर, वॉल्टर’ बघावा लागेल.

विकी डोनर, मद्रास कॅफे, परमाणु या चित्रपटांद्वारे जॉन अब्राहम अभिनेता म्हणून चांगलाच प्रगल्भ होत आहे. त्याचा विषय निवडण्याचा सेन्सही चांगला आहे. आता ‘रोमिओ, अकबर आणि वॉल्टर’मध्येही जॉन पुन्हा एकदा देशभक्ताच्या रुपात दिसला आहे.

या सिनेमात जॉननं कमाल अभिनय केला आहे यात शंकाच नाही. रोमिओ, अकबर आणि वॉल्टर या तिन्ही भूमिका त्याने जबरदस्त निभावल्या आहेत. चित्रपटाचा प्लॉटही उत्त्म आहे. पण त्याचं सादरीकरण, गोंधळात टाकणारी पटकथा, ढिसाळ दिग्दर्शन आणि रॉबी ग्रेवालचं दिग्दर्शन याने या सगळ्यावर पाणी फेरलंय. शेवटी काहीतरी सस्पेन्स ठेवण्याच्या नादात दिग्दर्शकानं केलेल्या बाळबोध पणाला तर साष्टांग दंडवत.

मध्यंतरापूर्वी तर सिनेमाची गती प्रचंड संथ आहे. आता काही तरी होईल, आता काही तरी होईल असं आपल्याला वाटतं. फक्त वाटतं बरं का ? पण मुळात काहीच घटना घडत नाही. तपन तुषार बसुची सिनेमॅटोग्राफी लाजवाब आहे. विशेषत: पाऊसातील दृश्य कमाल जमून आली आहेत. दिग्दर्शक रॉबीनं सिनेमाच्या कथेवर डीटेल अभ्यास केलाये. मात्र एक दिग्दर्शक म्हणून आपलं व्हिजन मोठ्या पडद्यावर मांडण्यात तो सपशेल अपयशी ठरलाय. या सिनेमातील काही प्रसंग तर अत्यंत बाळबोध वाटतात. तसेच सिनेमातील एखादा प्रसंग रंगत असतांनाच तिथे गाणं टाकण्याचा अट्टहास करुन माती करण्यात आलीये. बरं सिनेमातील गाणीही लक्षात राहण्यासारखी नाही. म्हणजेच संगीताच्या पातळीवरही हा चित्रपट तुम्हाला निराश करतो. हेरगिरीवर आधारित चित्रपट म्हंटलं की चित्तथरारक स्टंट्स आलेत; चित्रपट रिअलिस्टीक वाटावा म्हणून हा मोह दिग्दर्शकानं टाळला हे धाडसचं म्हणावं लागेल. जॉन अब्राहमसोबतच जॅकी श्रॉफ, राजेश श्रृंगारपुरे, सिकंदर खेर, रघुवीर यादव, सुचित्रा कृष्णमुर्ती, अनिल जॉर्ज यांनीही सिनेमात दमदार काम केलंय. विशेषत: रॉच्या चीफच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ यांना बघायला मजा येते. जॉनसोबत सिनेमत मॉनी रॉयची जोडी जमलीये.. पण तिला सिनेमात करण्यासारखं काही नाही. आपला प्रभाव पाडण्यात मॉनी अपयशी ठरलीये. तिच्यापेक्षा मराठमोळा राजेश श्रृंगारपुरे आणि रघुवीर यादव लक्षात राहतात. कलाकारांची एवढी चांगली फौज असूनही दिग्दर्शकाला त्यांचा चांगला उपयोग करता आलेला नाही. जॉननं एकट्याच्या खांद्यावर चित्रपट पेलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाये. मात्र त्याची मेहनत फेल ठरलीये.

एकूणचं काय तर ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ हा सिनेमा तुम्हाला सगळ्या पातळ्यांवर निराश करतो. जर तुम्ही जॉनचं डायहार्ड फॅन असाल तर त्याच्या लाजवाब अभिनयासाठी हा सिनेमा तुम्ही बघायला हरकत नाही. कलाकारांचा दमदार अभिनय सोडला तर बाकी या सिनेमात विशेष काही नाही असं मला वाटतं. ‘टीव्ही नाईन मराठी’कडून या सिनेमाला मी देतोय दीड स्टार.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.