मॅरेथॉनमध्ये धावताना हृदय विकाराचा झटका, 64 वर्षीय धावपटूचा मृत्यू

मुंबई मॅरेथॉन (Mumbai Marathon 2020) स्पर्धेत धावत असताना 64 वर्षीय स्पर्धकाला हृदय विकाराचा झटका आला.

मॅरेथॉनमध्ये धावताना हृदय विकाराचा झटका, 64 वर्षीय धावपटूचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 19, 2020 | 12:37 PM

मुंबई : मुंबई मॅरेथॉन (Mumbai Marathon 2020) स्पर्धेत धावत असताना 64 वर्षीय गजानन मालजलकर यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. उपचारासाठी त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ज्येष्ठ नागरिकांच्या गटातून गजानन मालजलकर धावत होते. ही स्पर्धा 10 किमीची होती. सकाळी 6.30 वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. चार किमी धावल्यानंतर अचानक गजानन यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. ते जमिनीवर कोसळले. यानंतर त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

गजानन मालजलकर यांच्याप्रमाणे आणखी दोन स्पर्धाकांना हृदय विकाराचा झटका आला. त्यांनादेखील तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दोघांपैकी एका स्पर्धकाची प्रकृती स्थिर असल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. तर 40 वर्षीय हिमांशू ठक्कर यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

आज सकाळी साडे पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई मॅरेथॉन (Mumbai Marathon 2020) स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. तर वरळी येथून हाफ मॅरेथॉनला सुरुवात झाली. मुंबई मॅरेथॉनचे यंदाचे 17 वे वर्ष असून या स्पर्धेत सुमारे 55,322 स्पर्धक सहभागी झाले होते.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.