AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai local | गर्दी हटेना, मोठे पाऊल उचलावे लागेल, मुंबई लोकलबाबत आरोग्य मंत्र्यांचे मोठे संकेत

काही ट्रेनमध्ये गर्दी आहे (Mumbai local lock down). त्यामुळे मोठे पाऊल उचलावे लागणार आहे. मुख्यमंत्री दुपारी साडेबारा वाजता सांगतील", अशी  माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Mumbai local | गर्दी हटेना, मोठे पाऊल उचलावे लागेल, मुंबई लोकलबाबत आरोग्य मंत्र्यांचे मोठे संकेत
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Mar 20, 2020 | 11:33 AM
Share

मुंबई : “मुंबईतील गर्दी कमी होतना दिसत नाही. काही ट्रेनमध्ये गर्दी आहे (Mumbai local lock down). त्यामुळे मोठे पाऊल उचलावे लागणार आहे. मुख्यमंत्री दुपारी साडेबारा वाजता सांगतील”, अशी  माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आरोग्य मंत्र्यांनी कोरोनाबाबतची (Mumbai local lock down) आजची अपडेट माहिती दिली. देशभरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भवा रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक बंद करण्याबाबत मोठे संकेत दिले आहेत.

“मुंबईची गर्दी कमी होताना दिसत नाही. काही लोकल ट्रेनमध्ये गर्दी दिसत आहे. तसेच बेस्ट बसेमध्येही गर्दी दिसत आहे. ज्या पद्धतीने गर्दी कमी होताना दिसली पाहिजे ती दिसत नाही. त्यामुळे अजून आणखी कडक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. ते आज 12.30 वाजता फेसबुक लाईव्हद्वारे सर्वांशी संवाद साधणार आहेत. तेव्हा तेअधिक माहिती देतील”, असं राजेश टोपे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची संख्या असल्याने मुंबई, ठाणे आणि पुणे या ठिकाणी जास्त कडक निर्णय घेण्याची गरज आहे. येथे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवेवरमुख्यमंत्री महत्वाचे निर्णय घेतील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

महाराष्ट्रातील संख्या 52 वर

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 49 वरुन 52 वर पोहोचली आहे. आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 52 वर पोहोचला आहे. मुंबईत 1, पुणे 1 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिलासादायक म्हणजे 5 रुग्ण जे रुग्णालयात अडमिट होते त्यांची प्रकृती सुधारली असून, लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आरोग्य मंत्र्यांनी कोरोनाबाबतची आजची अपडेट माहिती दिली.

संबंधित बातम्या 

Corona | महाराष्ट्रात सर्वात मोठा आशेचा किरण, 5 रुग्ण डिस्चार्जच्या मार्गावर, रुग्णांची संख्या 52 वर

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ