एमएमआरडीएने बेस्ट उपक्रमाचे आठ कोटी रुपये थकवले

मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने ज्यादा महसुलासाठी नवीन प्रयोग सुरु केला होता. मात्र तिथेही नुकसान सहन करावे लागत आहे. बेस्ट उपक्रमातर्फे वांद्रे संकुल ते वांद्रे स्थानक या दरम्यान गेले आठ महिने हायब्रीड वातानुकूलित बस चालवण्यात येत आह. याबाबत मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि बेस्ट उपक्रमामध्ये करार झाला होता. मात्र बेस्ट दुरुस्तीच्या खर्चापोटी आठ […]

एमएमआरडीएने बेस्ट उपक्रमाचे आठ कोटी रुपये थकवले
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने ज्यादा महसुलासाठी नवीन प्रयोग सुरु केला होता. मात्र तिथेही नुकसान सहन करावे लागत आहे. बेस्ट उपक्रमातर्फे वांद्रे संकुल ते वांद्रे स्थानक या दरम्यान गेले आठ महिने हायब्रीड वातानुकूलित बस चालवण्यात येत आह. याबाबत मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि बेस्ट उपक्रमामध्ये करार झाला होता. मात्र बेस्ट दुरुस्तीच्या खर्चापोटी आठ कोटी रुपये प्राधिकरणाने अद्याप बेस्टकडे जमा केलेले नाही. त्यामुळे ही रक्कम लवकर न दिल्याने ही बस सेवा बंद करण्याचा विचार करू असा इशारा महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिला आहे.

वांद्रे कुर्ला संकुल या बस मार्गावर प्रवाशी संख्या अधिक आहे. त्यामुळे या मार्गावर बेस्ट उपक्रमाने मार्च 2018 पासून येथील पाच बस मार्गांवर वातानुकूलित बस सेवा सुरु केली. या बस सेवेचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. करारानुसार एमएमआरडीएने 25 हायब्रीड बसगाड्या खरेदी केल्या होत्या. या बसगाड्यांसाठी काम करणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या चालक आणि वाहकांचा वेतन एमएमआरडीए देणार होते.

ठाणे, बोरिवली, वाशी, मीरा भाईंदर या ठिकाणाहून सकाळी प्रवाशांना वांद्रे- कुर्ला संकुलात आणणे व संध्याकाळी परत त्यांच्या ठिकाणी सोडण्यासाठी बस फेऱ्या निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र या कामासाठी देय असलेले आठ कोटी रुपयांचे बिल पाठवूनही एमएमआरडीएने तब्बल आठ कोटी रुपये थकवले असल्याची धक्कादायक बाबा उजेडात आली आहे. बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी हा गंभीर मुद्दा निदर्शनास आणला.

आर्थिक संकटात असल्याने कामगारांचे वेतन देण्यासही बेस्ट प्रशासनाकडे पैसे नाहीत. अशावेळी आठ कोटी थकवणे ही गंभीर बाब असल्याची नाराजी सदस्यांनी व्यक्त केली. याबाबत स्पष्टीकरण देताना एमएमआरडीएला ही थकीत रक्कम त्वरित जमा करण्याबाबत कळविण्यात आले आहे. पुन्हा एकदा त्यांना स्मरण करून देण्यात येईल, त्यानंतरही पैसे देण्यास एमएमआरडीएने टाळाटाळ केल्यास वांद्रे स्थाकन ते वांद्रे संकूल या मार्गावर धावणारी वातानुकूलित बस सेवा बंद करण्यात येईल, असे महाव्यवस्थापकांनी स्पष्ट केले.

काय आहे हायब्रीड वातानुकूलित बसचे वैशिष्ट्ये

  • 32 आसनी वातानुकूलित, लो फ्लोअर हायब्रीड बसमध्ये मोबाईल चार्जिंग पॉईंट्स, डिजिटल डिस्प्ले, प्रवाशांना माहिती देणारी यंत्रणा, वायफाय आणि तिकिट देण्यासाठी स्वयंचलित यंत्र यामध्ये आहे.
  • या बसगाड्या डिझेल आणि विजेवर चालतात. इंजिन चालू असतानाच या गाडीची बॅटरी पुन्हा चार्ज करता येते. या प्रत्येक बसगाडीची किंमत एक कोटी 61 लाख रुपये.
  • वांद्रे टर्मिनस-हिरे बाजार, कुर्ला स्टेशन- एसीबीएल, वांद्रे बस स्थानक- सीए इन्स्टिटयूट, सायन स्थानक- कलानगर-वांद्रे-कुर्ला संकुल आणि सायन स्थानक- एलबीएस मार्ग- बीकेसी या मार्गावर बसगाड्यांच्या फेऱ्या आहेत.
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.