AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांना मनसे सोबत हवीय, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मात्र विरोध!

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घेण्यासंदर्भात चर्चा सुरु असताना, या चर्चेला राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत मोठा धक्का बसला आहे. मनसेला आघाडीत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांनी जोरदार विरोध केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे स्वत: मनसेला आघाडीत घेण्यासाठी आग्रही आहेत. कालच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार […]

अजित पवारांना मनसे सोबत हवीय, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मात्र विरोध!
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत घेण्यासंदर्भात चर्चा सुरु असताना, या चर्चेला राष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीत मोठा धक्का बसला आहे. मनसेला आघाडीत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांनी जोरदार विरोध केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे स्वत: मनसेला आघाडीत घेण्यासाठी आग्रही आहेत.

कालच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर अजित पवारांनी मनसेला आघाडीत घेण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. मात्र, आता राष्ट्रवादीच्याच मुंबईतील नेत्यांनी मनसेला आघाडीत घेण्यास विरोध केला आहे. मुंबईतील्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची भूमिका अजित पवारांच्या कानावर घातल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

मनसे स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरली, तरी आघाडीला फायदाच होईल, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली.

अजित पवारांच्या ‘राज’भेटीनंतर ‘कृष्णकुंज’वरील हालचाली वाढल्या!

मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते हजर आहेत.

काल राज ठाकरेंना भेटल्यानंतर अजित पवार काय म्हणाले?

“होय, मी राज ठाकरे यांना भेटलो. मोदीविरोधी सर्व पक्ष, नेते एकत्र यावेत, हे माझे मत आहे. अंतिम निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचा आहे.”, असे म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरे यांना आघाडीत घेण्यासंदर्भात सहमती दर्शवली. तसेच, “कधी काळी भाजपाचा पाठिंबा घेणाऱ्या मायावतीही आज मोदी विरोधात आहेत. भाजपसोबत असणारे चंद्राबाबू नायडू विरोधात आहेत.”, असे म्हणत अजित पवारांनी मनसेला आघाडीत घेण्यासाठी विरोध करणाऱ्यांनाही उत्तर दिले आहे.

VIDEO : शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेच्या बैठका, महाराष्ट्रातील राजकारणाच्या वेगवान घडामोडी

Follow Us
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?.

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली.

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक.

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक