पत्री पुलाच्या कामासाठी असणार नाईट ट्रॅफिक अँड पॉवर ब्लॉक, रेल्वेकडून वेळापत्रक जारी

पत्री पुलावर गर्डर टाकल्यानंतर पुलाशी संबंधित इतर कामासाठी पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे मध्य रेल्वे मुंबई विभाग रात्रीचा ट्राफीक आणि पॉवर ब्लॉक्स परिचालीत करणार आहे.

पत्री पुलाच्या कामासाठी असणार नाईट ट्रॅफिक अँड पॉवर ब्लॉक, रेल्वेकडून वेळापत्रक जारी
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 9:54 PM

मुंबई : कल्याण इथल्या पत्री पुलाशी संबंधित कामासाठी नाईट ट्रॅफिक अँड पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पत्री पुलावर गर्डर टाकल्यानंतर पुलाशी संबंधित इतर कामासाठी पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे मध्य रेल्वे मुंबई विभाग रात्रीचा ट्राफीक आणि पॉवर ब्लॉक्स परिचालीत करणार आहे. यासाठी अनेक रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. रात्रीच्या या ब्लॉक्सची माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. (Night traffic and power block for Patri bridge work schedule issued by Railways)

ब्लॉक III : दिनांक 27/28.11.2020 रोजी (शुक्रवार/शनिवार रात्री) आणि ब्लॉक IV : दिनांक 28/29.11.2020 रोजी (शनिवार / रविवार रात्री) या दोन्ही दिवशी मध्यरात्री 02.00 ते पहाटे 05.00 पर्यंत (3 तास) ब्लॉक घेण्यात येणार आहे.

(I) 27/28.11.2020 आणि 28/ 29.11.2020 मध्यरात्री उपनगरी ट्रेनचे कामकाज:

– डोंबिवली व कल्याण स्थानकांदरम्यान मध्यरात्री 02.00 ते पहाटे 05.00 दरम्यान उपनगरी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.

– ब्लॉक सुरू होण्यापूर्वी शेवटची डाऊन उपनगरी गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री 00.25 वाजता कर्जत करता सुटेल.

– ब्लॉक सुरू होण्यापूर्वी शेवटची अप उपनगरी गाडी कल्याण येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करिता जाणारी रात्री 11.05 वाजता जलद मार्गावर आणि रात्री

11.52 वाजता धिम्या मार्गावर सुटेल. (दि. 28.11.2020 रोजी रात्री 10.54 वाजता कल्याण येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी जलद मार्गावरील शेवटची उपनगरी गाडी असेल)

– ब्लॉक संपल्यावर पहिली डाऊन उपनगरी गाडी कुर्ला येथून पहाटे 04.51 वाजता टिटवाळा करीता सुटेल.

– ब्लॉक संपल्यावर पहिली अप उपनगरी गाडी कल्याण येथून अप धिम्या मार्गावर पहाटे 05.03 वाजता आणि अप जलद मार्गावर पहाटे 05.04 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करिता सुटेल.

(II) मेल/एक्सप्रेस परिवर्तित मार्गावरून धावणार

– दि. 28.11.2020 आणि 29.11.2020 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणा-या खालील अप मेल/ एक्स्प्रेस गाड्या कर्जत – पनवेल -दिवा मार्गे वळविल्या जातील.

– गाडी क्रमांक 01020 अप भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष.

– गाडी क्रमांक 02702 अप हैदराबाद- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष.

– गाडी क्रमांक 01140 अप गदग- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष.

– कल्याण इथल्या प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्या कर्जत आणि दिवा स्थानकांवर थांबतील. (Night traffic and power block for Patri bridge work schedule issued by Railways)

(III) मेल/एक्सप्रेसगाड्यांचे नियमन

– मुंबईकडे येणाऱ्या खालील अप मेल/एक्स्प्रेस गाड्या दि. 28.11.202 आणि दि. 29.11.2020 रोजी ब्लॉकच्या कालावधीत प्रत्येक गाडीच्या समोर दर्शविलेल्या स्टेशनवर काही काळ नियमित केल्या जातील आणि आपल्या गंतव्यस्थानावर नियोजित वेळेपेक्षा उशिराने येतील.

– गाडी क्रमांक 01062 अप दरभंगा- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, एलटीटी आगमन पहाटे 03.40 वाजता; टिटवाळा येथे नियमन

– गाडी क्र. 02541 अप गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, एलटीटी आगमन पहाटे 04.00 वाजता; खडवली येथे नियमन

– गाडी ट्रेन क्रमांक 01016 अप गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस; एल.टी.टी. आगमन -पहाटे 04.20 वाजता; वाशिंद येथे नियमन

– गाडी क्रमांक 02810 अप हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष, सीएसएमटी आगमन- पहाटे 05.20 वाजता; आटगाव येथे नियमन

– गाडी क्रमांक 01142 अप किनवट – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष सीएसएमटी आगमन पहाटे 05.35 वाजता; खर्डी येथे नियमन

– गाडी क्रमांक 07018 अप सिकंदराबाद – राजकोट विशेष, कल्याण आगमन पहाटे 04.45 वाजता; अंबरनाथ येथे नियमन (फक्त 29.11.2020 रोजी).

दरम्यान, या पायाभूत सुविधांमुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर व्यक्त केली आहे. तर सदर प्रसिद्धी पत्रक मध्य रेल्वे, जनसंपर्क विभाग यांचे द्वारा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई इथून जारी करण्यात आले आहे.

इतर बातम्या – 

KDMC Update | पत्री पूलावरून शिवसेना-भाजपमध्ये रंगतोय श्रेयवाद

पत्री पूल पाडणार, रविवारी मध्य रेल्वेवर 6 तासांचा विशेष ब्लॉक

(Night traffic and power block for Patri bridge work schedule issued by Railways)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.