AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण; किरकोळ बाजारात मात्र महागाई कायम

नवी मुंबई : परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं. त्यानंतर मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, आता भाजीपाला मार्केटमध्ये आज एकूण 596 गाड्यांची आवक झाली आणि भाज्यांच्या दरात घसरण सुरु आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या किमती वाढल्या […]

मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण; किरकोळ बाजारात मात्र महागाई कायम
एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 10, 2020 | 12:40 AM
Share

नवी मुंबई : परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं. त्यानंतर मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, आता भाजीपाला मार्केटमध्ये आज एकूण 596 गाड्यांची आवक झाली आणि भाज्यांच्या दरात घसरण सुरु आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या किमती वाढल्या होत्या. आता बाजारात 40 रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा कोबी 10 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे (Rate of Vegetables decreases in APMC but not in Market).

एपीएमसीत दर कमी झाले असले तरी किरकोळ बाजारावर कोणाचे नियंत्रण नसल्याने घाऊक बाजारात स्वस्त दरात मिळत असलेला भाजीपाला किरकोळ बाजारात दुप्पट दराने विकला जात आहे.

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज जवळपास 596 गाड्यांची आवक झाली. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सध्या बाजारात फ्लॉवर 10 ते 20 रुपये, कोबी 10 ते 25 रुपये, मिरची 30 ते 40 रुपये, काकडी 8 ते 14 रुपये किलो विकली जात आहे. टोमॅटो 20 ते 30 रुपये, वांगी 35 ते 40 रुपये तर कोथिंबीर 15 ते 25 रुपये, मेथी 10 ते 20 रुपये, पालक 6 ते 10 रुपये दराने विकली जात आहे.

भाजीपाला आणि दर

फरसबी 30 ते 40 रुपये प्रतिकिलो फ्लॉवर 10 ते 12 रुपये प्रतिकिलो गवार 50 ते 60 रुपये प्रतिकिलो गाजर 35 ते 40 रुपये प्रतिकिलो भेंडी 20 ते 30 रुपये प्रतिकिलो कोबी 10 ते 12 रुपये प्रतिकिलो मिरची 40 ते 50 रुपये प्रतिकिलो टोमॅटो 20 ते 30 रुपये प्रतिकिलो काकडी 8 ते 15 रुपये प्रतिकिलो वांगी 35 ते 40 रुपये प्रतिकिलो कोथिंबीर 15 ते 25 रुपये प्रतिकिलो

हेही वाचा :

Food | मेंदूवरचा ताण कमी करा, ‘या’ भाज्या खा आणि स्मरण शक्ती वाढवा!

पाऊस रखडल्याने भाज्या कडाडल्या, नाशिकमधील भाज्यांचे दर गगनाला

Rate of Vegetables decreases in APMC but not in Market

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष