AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवस्मारकाचं काम तातडीने थांबवा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आदेश

मुंबई : अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकणार आहे. कारण, सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवस्मारकाचं काम तातडीने थांबवण्यात यावं, असे आदेश कंत्राटदाराला दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी शिवस्मारकाचं काम थांबवण्याचे तोंडी आदेश दिले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही कार्यवाही करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने तोंडी आदेश दिल्याचे सरकारी वकिलाने सार्वजनिक बांधकाम विभागाला […]

शिवस्मारकाचं काम तातडीने थांबवा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे आदेश
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:39 PM
Share

मुंबई : अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाच्या कामाचा मुहूर्त पुन्हा एकदा हुकणार आहे. कारण, सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवस्मारकाचं काम तातडीने थांबवण्यात यावं, असे आदेश कंत्राटदाराला दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी शिवस्मारकाचं काम थांबवण्याचे तोंडी आदेश दिले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही कार्यवाही करण्यात आली.

सुप्रीम कोर्टाने तोंडी आदेश दिल्याचे सरकारी वकिलाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्राद्वारे कळविले होते. राज्य सरकारसाठी हा मोठा फटका मानला जातोय. यामुळे शिवस्मारक प्रकल्पाचं काम आणखी रखडणार आहे. काम थांबवण्याच्या आदेशानंतर कंत्राटदाराला द्याव्या लागणाऱ्या पेमेंटवर सार्वजनिक बांधकाम विभाग फेरविचार करणार आहे.

144 कोटी देण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पेंडिंग आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग यावर फेरविचार करणार आहे. दरम्यान, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी याबाबत बैठक बोलावली आहे. बैठकीत पुढील दिशा ठरवण्यात येईल.

सुप्रीम कोर्टात काय झालं?

सुप्रीम कोर्टाने शिवस्मारकाचं काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरणवादी देबी गोयंकांच्या कॉन्झर्व्हेशन अॅक्शन ट्रस्टने सुप्रीम कोर्टात स्मारकाच्या कामाला अंतरिम स्थगितीच्या मागणीसाठी धाव घेतली. स्मारकाच्या समुद्रातील कामाला पर्यावरणविषयक परवानग्या देणाऱ्या केंद्र सरकारच्या निर्णयाला जनहित याचिकेच्या माध्यमातून हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. याचिका प्रलंबित असताना अंतरिम मनाई हुकूम देण्यास कोर्टाने नकार दिल्यामुळे पर्यावरणवाद्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!