मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'मातोश्री'जवळचा चहावाला 'कोरोना'ग्रस्त, चहावाल्याकडे गेलेले पोलिसही क्वारंटाईन

मातोश्रीजवळच्या चहा विक्रेत्याची 'कोरोना' चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्याच्या संपर्कातील चौघांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे (Tea vendor near Matoshree corona positive)

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'मातोश्री'जवळचा चहावाला 'कोरोना'ग्रस्त, चहावाल्याकडे गेलेले पोलिसही क्वारंटाईन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ परिसरातील चहा विक्रेत्याची ‘कोरोना’ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. चहावाल्याच्या संपर्कातील चौघांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे, तर काही पोलिसांनाही विलग ठेवण्यात आलं आहे. (Tea vendor near Matoshree corona positive)

वांद्रे पूर्व येथील कलानगर भागात ‘मातोश्री’ हे उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान आहे. मुख्यमंत्री बहुतांश काम ‘मातोश्री’तूनच पाहतात. ‘मातोश्री’पासून हाकेच्या अंतरावर चहाची टपरी आहे. तिथल्या चहा विक्रेत्याला काल प्रकृतीचा त्रास झाल्याने संपूर्ण भागात प्रवेश मनाई करण्यात आली होती. ‘मातोश्री’च्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर कालपासूनच सील करण्यात आला आहे.

संबंधित चहा विक्रेत्याची ‘कोरोना’ चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं वृत्त ‘पीटीआय’ने मुंबई महापालिकेच्या हवाल्याने दिलं आहे. या चहावाल्याच्या संपर्कातील चौघांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. हे चारही जण चहावाल्याच्या इमारतीत राहणारे आहेत.

हेही वाचामी जितेंद्र आव्हाड बोलतोय, मी बोलतो ते तुम्हाला पाळावंच लागेल, विनाकारण फिरणाऱ्याना आव्हाडांची ताकीद

विशेष म्हणजे, चहावाल्याकडे गेलेल्या काही पोलिसांनाही विलग करण्यात आलं आहे. जवळपास 150 पोलिस आणि एसआरपीएफच्या जवानांना वांद्र्याच्या उत्तर भारतीय संघ भवनमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ही पावले टाकली आहेत.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला परिसर मुंबई महापालिकेने निर्जंतुक केला आहे. चहावाल्याच्या टपरीपासून जवळच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचेही घर आहे. या भागात प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही वर्दळ असते.

कलानगर हा ‘एच पूर्व’ विभागामध्ये मोडतो. मुंबई महापालिकेने सर्वाधिक ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आढळलेले मुंबईतील विभाग ‘हॉटस्पॉट’ म्हणून जाहीर केले आहेत. 5 एप्रिलपर्यंत सापडलेल्या रुग्णांच्या आकड्यावरुन हा विभाग गंभीर प्रकारात मोडतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थानासोबतच ‘वर्षा’ हे सरकारी निवासस्थानही गंभीर विभागामध्ये मोडते. (Tea vendor near Matoshree corona positive)

महाराष्ट्रातील ‘कोरोना’ग्रस्तांची ताजी आकडेवारी इथे पाहा :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई84524558844899
पुणे (शहर+ग्रामीण)2814213406872
ठाणे (शहर+ग्रामीण)47935181561270
पालघर 74702965126
रायगड58402741106
रत्नागिरी71247127
सिंधुदुर्ग2461725
सातारा133776948
सांगली43025111
नाशिक (शहर +ग्रामीण)52162935225
अहमदनगर (शहर+ग्रामीण)58035715
धुळे124870462
जळगाव 42362420278
नंदूरबार 197839
सोलापूर32141692296
कोल्हापूर 92073212
औरंगाबाद65682788294
जालना71938024
हिंगोली 2942501
परभणी128834
लातूर 42522922
उस्मानाबाद 26418612
बीड142953
नांदेड 39424214
अकोला 1662119986
अमरावती 69045130
यवतमाळ 33823511
बुलडाणा 31816913
वाशिम 120823
नागपूर1719129615
वर्धा 17131
भंडारा91770
गोंदिया 1671042
चंद्रपूर110630
गडचिरोली73601
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)113025
एकूण2,06,6191,11,7408,822
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *