अंड्यांनी भरलेला ट्रक चोरट्यांनी पळवला!

अजय शर्मा, टीव्ही 9, मराठी, अंबरनाथ : अंड्यांनी भरलेला ट्रक चोरट्यांनी पळवल्याची घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आली आहे. या ट्रकमध्ये सुमारे 5 लाख रुपयांची अंडी होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चोरीला गेलेली अंडी, ट्रक आणि चोरांचा शोध सुरु केला आहे. कर्नाटक राज्यातून कोंबडीची अंडी घेऊन निघालेल्या ट्रकला अंबरनाथमध्ये पहाटेच्या सुमारास चार …

, अंड्यांनी भरलेला ट्रक चोरट्यांनी पळवला!

अजय शर्मा, टीव्ही 9, मराठी, अंबरनाथ : अंड्यांनी भरलेला ट्रक चोरट्यांनी पळवल्याची घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आली आहे. या ट्रकमध्ये सुमारे 5 लाख रुपयांची अंडी होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चोरीला गेलेली अंडी, ट्रक आणि चोरांचा शोध सुरु केला आहे.

कर्नाटक राज्यातून कोंबडीची अंडी घेऊन निघालेल्या ट्रकला अंबरनाथमध्ये पहाटेच्या सुमारास चार जणांच्या टोळीने अडवलं. ट्रकचालकासह त्याच्या मुलाला मारहाण करुन जबरदस्तीने कारमध्ये नेऊन टिटवाळा परिसरातील जंगलात सोडून दिलं. त्यानंतर चोरटे ट्रक घेऊन फरार झाले आहे.

कर्नाटक राज्यातील जिल्हा बिदर येथून मोहमंद नबी उस्मानसाहेब शेख (वय 44 वर्षे) हा ट्रकचालक त्याचा मुलगा मुजम्मिल (वय 17 वर्षे) याच्यासोबत अंड्यांनी भरलेला ट्रक घेऊन अंबरनाथकडे निघाले होते. या ट्रकमध्ये 4 हजार 700 ट्रे कोंबडीची अंडी होती. म्हणजेच, सुमारे 1 लाख 41 हजार नग 5 लाख रुपये किंमतीची अंडी होती. महाराष्ट्र एग्ज सेंटर यांच्यापर्यंत अडी पोहोचवायची होती.

पहाटेच्या सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ येथील टी सर्कल ग्रीनसीटीच्या बाजूने येत असताना ट्रकच्या पाठीमागून कारमधून आलेल्या चार जणांच्या टोळीने तो ट्रक थांबवला. त्यांनी ट्रकचालक मोहमंद शेख व त्यांचा मुलगा यांना मारहाण करून त्यांच्या डोळ्याला कापडी रुमाल बांधून त्यांच्या खिशातील दोन हजारांची रोख रक्कम, मोबाईल फोन प्रथम काढून घेतला आणि त्या दोघांना जबरदस्तीने कारमधून नेवून टिटवाळा परिसरातील रायता येथील निर्जन स्थळी जंगलात  सोडले.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चार अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासही सुरु करण्यात आला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *