मॉडेलला खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, पोलिसांनी हॅकरची जिरवली

ब्रिजभान जैसवार, टीव्ही 9, मराठी, मुंबई: मॉडेल महिलेचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक करुन, तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हॅकरने मॉडेलकडे एक लाख रुपयांची मागणी केली. मात्र मॉडेलने पैसे देण्यास नकार देताच, हॅकरने तिला खासगी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करुन तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुंबईच्या वर्सोवा पोलिसांनी …

मॉडेलला खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, पोलिसांनी हॅकरची जिरवली

ब्रिजभान जैसवार, टीव्ही 9, मराठी, मुंबई: मॉडेल महिलेचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक करुन, तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हॅकरने मॉडेलकडे एक लाख रुपयांची मागणी केली. मात्र मॉडेलने पैसे देण्यास नकार देताच, हॅकरने तिला खासगी फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करुन तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुंबईच्या वर्सोवा पोलिसांनी हॅकरला विशाखापट्टणम येथून अटक केली आहे. चंद्रप्रकाश जोशी असं या हॅकरचं नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
काही दिवसांपूर्वी मॉडेल आरिश जैनला  एक मेल आला होता. हॅकर चंद्रप्रकाश जोशीनेच तो मेल पाठवला होता. आरिशने मेलमध्ये असलेली लिंक ओपन केल्यानंतर तिचं अकाऊंट हॅक झालं. अकाऊंट हॅक झाल्याची कल्पना आरिशला त्यावेळी आली नाही. हॅकरने तातडीने आरिशचं सगळे पासवर्ड बदलले. त्यानंतर एक लाख रुपये बँक अकाऊंट ट्रान्सफर कर अन्यथा, खासगी फोटो व्हायरल करेन अशी धमकी तो आरिशला देऊ लागला. पैसे न दिल्यास तुझे खासगी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जातील, अशा धमक्या हॅकर मॉडेलला सातत्याने देत होता. या सर्व प्रकारामुळे आरिशला आपले अकाउंट हॅक झाल्याचं लक्षात आलं.

या सर्व प्रकारानंतर आरिशने वर्सोवा पोलीस ठाण्याच्या सायबर विंगमध्ये तक्रार दाखल केली. मात्र, तक्रार दाखल झाल्यानंतरही हॅकर मॉडेलला फोन करून धमक्या देत होता. माझं कुणीही काहीही करु शकत नाही, असं हॅकर मॉडेलला सांगत होता. आरोपीच्या धमक्यांमुळे आरिश अत्यंत घाबरली होती. तिने आरोपीला पैसे देण्याची तयारी दर्शवली. पण घाबरलेल्या आरिशने पोलीस स्टेशन गाठणं पसंत केलं होतं. मात्र आरोपी तिला सतत फोन करून धमक्या देतच राहिला. आरोपीने अचानक मॉडेलला फोन करुन पैसे त्याच्या अकाऊंटमध्ये न टाकता पेटीएम (PAYTM ) मार्फत देण्यास सांगितलं.

या सर्व प्रकारादरम्यान पोलिसांनी अरिशला आरोपीच्या संपर्कात राहायला सांगितलं. जेणेकरुन आरोपीला पैसे मिळतील अशी खात्री होईल आणि पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचणं शक्य होईल. आरिशने आरोपीला बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि त्याला खासगी फोटो व्हायरल करु नकोस अशी विनवणी केली. यादरम्यान पोलिसांनी आरोपीचं लोकेशन ट्रेस केलं आणि त्याला विशाखापट्टणमवरुन अटक करुन मुंबईत आणलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *