AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हरियाणामध्ये स्थानिक तरुणांना खासगी नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण; 15 जानेवारीपासून होणार नव्या कायद्याची अंमलबजावणी

खासगी क्षेत्रात जॉब करू इच्छिनाऱ्या स्थानिकांसाठी हरियाणा सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आता स्थानिक तरुणांना राज्यातील खासगी नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण मिळणार आहे. नवा कायदा येत्या 15 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.

हरियाणामध्ये स्थानिक तरुणांना खासगी नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण; 15 जानेवारीपासून होणार नव्या कायद्याची अंमलबजावणी
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 07, 2021 | 4:36 PM
Share

नवी दिल्ली – खासगी क्षेत्रात जॉब करू इच्छिनाऱ्या स्थानिकांसाठी हरियाणा सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आता स्थानिक तरुणांना राज्यातील खासगी नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण मिळणार आहे. नवा कायदा येत्या 15 जानेवारी 2022 पासून लागू होणार असून, याबाबत हरियाणा सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी म्हटले आहे की, राज्यातील तरुणांना मोठ्याप्रमाणात  रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर  रोजगारासंबधीत नवा कायदा येत्या 15 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे. या कायद्यामुळे स्थानिकांना मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन, स्थलांतरणाला आळा बसेल.

राज्यपालांची विधेयकाला मंजुरी 

या वर्षीच्या मार्च महिन्यामध्येच हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी संबंधित विधेयकाला मान्यता दिली होती. त्यामुळे आता 15 जानेवारी 2022 पासून खासगी क्षेत्रातील रोजगारासंबंधी नवा कायदा लागू होणार आहे. नव्या कायद्यानुसार जे लोक हरियानाचे रहिवासी असून खासगी क्षेत्रात काम करत आहेत आणि त्यांचे मासिक उत्पन्न हे 30 हजारांच्या खाली आहे, अशा लोकांना आता नोकरीमध्ये 75 टक्के आरक्षण दिले जाणार आहे.

…तर कंपन्यांवर होणार कारवाई 

खट्टर यांनी म्हटले आहे की, हा नवा कर्मचारी कायदा खासगी क्षेत्रातील सर्व अस्थापना, कंपन्या आणि व्यवसायांना  लागू होणार आहे. नियमानुसार कंपन्यांमध्ये 75 टक्के स्थानिक तरुणांची भरती करणे बंधनकारक असणार आहे. ज्या अस्थापनाचे कर्मचारी हे दहापेक्षा कमी आहेत, अशा व्यवसायांना या कायद्यामधून सूट देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या सर्वांची राज्य सरकारकडे नोंद राहाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्र्यांकडून कायद्याचे स्वागत

उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी देखील या कायद्याचे कौतुक केले असून, नव्या कायद्यामुळे रोजगारासंबंधीत स्थानिक तरुणांवर होणारा अन्याय दूर होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्ती केली आहे. नव्या कायद्यामुळे स्थानिक तरुणांना खासगी क्षेत्रातीत नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्ष मिळणार असून, ज्या कंपन्या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे चौटाला यांनी सांगितले.

संबंधित बातम्या 

पंजाब सरकारची मोठी घोषणा; पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात, सर्वसामान्यांना दिलासा

पंतप्रधानांच्या प्रयत्नामुळे भारत मजबूत स्थितीमध्ये; जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली दखल, नड्डांनी केले मोदींचे कौतुक

जम्मू-काश्मीरमध्ये दशहतवाद्यांविरोधात शोध मोहीम; सर्च ऑपरेशनचा 27 वा दिवस, आतापर्यंत 9 जवान शहीद

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..