रावण दहन करताना जळता रावण लोकांच्या अंगावर कोसळला

| Updated on: Oct 05, 2022 | 10:39 PM

रावण दहन करतानाच हरियाणाच्या यमुनानगरमध्ये मोठा अपघात घडला. या ठिकाणी रावण दहनावेळी जळणारा रावणाचा पुतळाच लोकांच्या अंगावर कोसळला आहे.

रावण दहन करताना जळता रावण लोकांच्या अंगावर कोसळला
Image Credit source: tv9
Follow us on

यमुनानगर : कोरोनाच्या काळानंतर देशात पहिल्यांदाच काही सण साजरे करण्यात येत आहेत. यामुळे लोकांच्या आनंदाला उधाण आलं आहे, दरम्यान देशाच्या विविध ठिकाणी दसरा साजरा केला जात आहे. तर दसऱ्यात रावण दहन करण्याची परंपरा उत्तर भारतात मोठी आहे. मात्र रावण दहन करतानाच हरियाणाच्या यमुनानगरमध्ये मोठा अपघात घडला. या ठिकाणी रावण दहनावेळी जळणारा रावणाचा पुतळाच लोकांच्या अंगावर कोसळला आहे. ज्यामुळे अनेक जण जखमी झाल्याची शक्यता आहे. या अपघाताचा व्हीडिओ आता समोर आला आहे. तर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे.

80 फूट उंच पुतळा

हरियाणातील यमुना नगरमध्ये बुधवारी दसरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील दसरा ग्राऊंडवर रावण दहन करण्यात येणार होते. तर दहन करण्यासाठी रावणाचा 80 फूट उंच पुतळा तयार करण्यात आला होता. यानंतर सायंकाळी तो दहन करण्यातही आला. मात्र दहनावेळी हा जळणारा पुतळा थेट खाली उपस्थित असलेल्या गर्दीवर पडला. यामुळे अनेक जण जखमी झाल्याची शक्यता आहे. तर यात कोणतीही जिवित हानी झाल्याचे अद्यापही समोर आलेलं नाही.

हे सुद्धा वाचा

पहा व्हीडिओ

जळणाऱ्या तुकड्यांनी घात केला

शहरातील दसरा ग्राऊंडवर रावण दहनासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. तर जेव्हा रावण दहन करण्यात आला, त्यावेळी उपस्थित लोकांमधील काही जण पुतळ्याचे जळणारे तुकडे गोळा करण्यासाठी धावले. या वेळीच त्या जमावावर जळणारा पुतळा पडला.

फटाक्यांचा भडका उडाल्याने इतर जखमी

रावन दहनावेळी 80 फूट उंच पुतळ्यात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचा वापर करण्यात आला होता. दरम्यान हा पुतळा अचानक उपस्थित लोकांवर पडला. यावेळी पुतळ्यात भरण्यात आलेल्या फटाक्यांचा भडका उडाल्याने त्यात काही जण भाजले असल्याचं सांगण्यात येत आहे.