Delhi CJP Protest : अभिजीत दीपकेंना धक्का, सीजेपीला वाटतय सगळं वातावरण सरकार विरोधी झालय पण आंदोलन स्थळी ते समोरुन आले आणि..

Delhi CJP Protest : अभिजीत दीपकेच्या कॉकरोच जनता पार्टीने आज दिल्लीत कनॉट प्लेस सेंट्रल पार्क येथे तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं. मागच्या काही दिवसांपासून दिल्लीत सातत्याने आंदोलनं सुरु आहेत.

Delhi CJP Protest : अभिजीत दीपकेंना धक्का, सीजेपीला वाटतय सगळं वातावरण सरकार विरोधी झालय पण आंदोलन स्थळी ते समोरुन आले आणि..
Delhi
| Updated on: Oct 16, 2026 | 8:30 PM

सध्या दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन सुरु आहे. कॉकरोच जनता पार्टी आणि काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. आज सीजेपीने तिरंगा मार्च आयोजित केला होता. यावेळी सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपकेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. सीजेपीच्या आंदोलनाच्यावेळी एक वेगळी गोष्ट पहायला मिळाली. तिरंगा मार्च दरम्यान दिल्लीच्या पालिका बाजारमधील दुकानदार ज्ञानेश कुमार यांच्या समर्थनार्थ समोर आले आहेत. व्यापाऱ्यांचा एक गट कनॉट प्लेस येथे पोहोचला. व्यापाऱ्यांच्या या गटाने सीजेपीच्या विरोधात प्रदर्शन करताना ज्ञानेश कुमार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या दरम्यान व्यापाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ मोदी-मोदी अशी घोषणाबाजी केली. दिल्ली पोलिसांच्या समर्थनार्थही घोषणा दिल्या.

सीजेपीने आज कनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कमध्ये ‘लेहरा दो तिरंगा’ प्रदर्शनाचं अपील केलं होतं. या दरम्यान पालिका बाजारमधील व्यापारी तिथे पोहोचले. व्यापाऱ्यांनी सीजेपीच्या विरोधात आंदोलन केलं. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या दरम्यान एका व्यक्तीने सांगितलं की, खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना तिरंगा फडकवणं चुकीच नाहीय. पण तिरंग्याच्या नावाखाली अराजकता पसरवायला देऊ शकत नाही.

Loading...

लोक तिरंगा घेऊन पोहोचत होते

कनॉट प्लेस येथे एका बाजूने सीजेपीचे आंदोलक तिरंगा फडकवत तिथे पोहोचले. दुसऱ्याबाजूने पालिकाबाजारचे दुकानदार सीजेपीच्या विरोधात प्रदर्शन करत आले. दिल्ली पोलिसांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या दरम्यान कनॉट प्लेस येथे लोक तिरंगा घेऊन पोहोचत होते. सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपकेला ताब्यात घेतल्यानंतरही या भागात विरोध प्रदर्शन कायम सुरु होतं.

नेहा बोरा यांना सुद्धा ताब्यात घेतलं

अभिजीत दीपकेला ताब्यात घेतल्यानंतर बराखंबा रोडवर आंदोलन करणाऱ्या डाव्या विचारधारेच्या विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांना सुद्धा ताब्यात घेतलं. ऑल इंडिया स्टूडेंट्स असोसिएशनच्याय अध्यक्ष नेहा बोरा यांना सुद्धा ताब्यात घेतलं. कनॉट प्लेस येथील घटनाक्रमादरम्यान पालिका बाजारमधील व्यापाऱ्यांची घोषणाबाजी एक वेगळी गोष्ट ठरली. त्यांनी दिल्ली पोलिस आणि ज्ञानेश कुमार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us