Abhijeet Dipke : अभिजीत दिपकेंनी आंदोलन अचानक का थांबवलं? भीती, नवा डाव की आणखी वेगळं काय?

अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आंदोलन थांबवण्याची घोषणा केली आहे. दिपकेंच्या घोषणेवरून वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे.

Abhijeet Dipke : अभिजीत दिपकेंनी आंदोलन अचानक का थांबवलं? भीती, नवा डाव की आणखी वेगळं काय?
abhijeet dipke news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 21, 2026 | 12:11 PM

कॉक्रोच जनता पार्टी संस्थापक अभिजीत दिपकेंनी अचानक आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला. दिपकेंनी तरुणांना सणासुदीच्या काळात कुटुंबाला वेळ द्या, अशी सूचना दिली. अभिजीत दिपके यांच्या आवाहनानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक राहणारी कॉक्रोच जनता पार्टी अचानक का नरमली, अशी चर्चा सुरू झाली आहे. दिपकेंच्या घोषणेमागे काही कारणे आहेत का, याचा अंदाज राजकीय तज्ज्ञ लावू लागली आहेत.

अभिजीत दिपके यांच्या निर्णयाच्या मागे आणखी वेगळं काही असल्याचे बोलले जात आहे.  नेहा बोरा आणि वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ‘रेजीम चेंज’वर भाष्य केलं होतं. त्यांनी आंदोलनाची प्रेरणा ही बांगलादेशकडून  घ्यावी, असे त्यांनी म्हटलं. या विधानाने कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. या आंदोलनाला षडयंत्र ठरवले जाऊ शकते, अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करून पुन्हा नव्याने सुरू करणे योग्य असल्याची चर्चा सीजेपीमध्ये आहे.  काही जण या दिपकेंच्या भूमिकेकडे डावपेच म्हणून पाहत आहे. एकीकडे दिपके हे सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची तुरुंगातून सुटका करण्याच्या मागे लागले आहेत. यामुळे ते आंदोलकांना घरी जाण्यास सांगत आहेत. सध्या सीजेपी दोघांची सुटका व्हावी, यासाठी दिल्ली हायकोर्टात गेले आहेत. त्यामुळे अभिजीत दिपके यांनी आंदोलन थांबवून दोघांच्या सुटकेला प्राधान्य दिल्याचे संगितले जात आहे.

Loading...

तिसरं कारण काय?

अभिजीत दिपके यांच्या निर्णयामागे वेगळ्या कारणाची जोरदार चर्चा आहे.  ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाला धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधातील आंदोलनापेक्षा कमी दिसून येत आहे. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात फार कमी आंदोलक रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. दिल्लीत 7000 आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. 20 जुलै रोजी संसद मार्चची घोषणा केली, त्यावेळी तरुणांची संख्या प्रचंड होती. तर 16 ऑक्टोबर रोजी ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाच्या दिवशी विद्यार्थ्यांपेक्षा इतर आंदोलकांची सख्या जास्त होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us