AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सौरव दास, आशुतोष रांका यांच्या अडचणीत वाढ, चौकशीचा फास आवळला, क्राइम ब्रँचची एंट्री, आता…

Abhijeet Dipke Ashutosh Ranka Sourav Das: CJP चे नेते सौरव दास, आशुतोष रांका यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे समोर आले आहे. आणखी एका प्रकरणाचा गुन्हा क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला आहे. काय आहे याविषयीची अपडेट?

सौरव दास, आशुतोष रांका यांच्या अडचणीत वाढ, चौकशीचा फास आवळला, क्राइम ब्रँचची एंट्री, आता...
सौरव दास, आशुतोष रांका यांच्या अडचणीत वाढ, क्राइम ब्रँचची एंट्री
| Updated on: Oct 21, 2026 | 7:21 AM
Share

Abhijeet Dipke Ashutosh Ranka Sourav Das: कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. दिल्ली पोलिसांनी या दोन्ही नेत्यांच्या विरोधात नोंदवलेल्या एका दुसऱ्या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखा करणार आहे. नुकतेच हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आले आहे. यामुळे आता गुन्हे शाखा दोन्ही प्रकरणांचा एकाचवेळी समांतर पातळीवर तपास करणार आहे. यामुळे या दोन्ही नेत्यांविरोधात चौकशीचा फास आवळल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे अभिजीत दिपके यांच्या व्हायरल व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे.

जंतरमंतरवरील आंदोलनानंतर अडचणीत वाढ

13 ऑक्टोबर रोजी सौरभ दास, आशुतोष रांका, अजिंक्य शिंदे यांच्यासह 11 जणांवर जंतरमंतर परिसरात प्रतिबंध झुगारून आंदोलन केल्याचा आणि बळजबरीने प्रवेस केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याप्रकरणात सोमवारी पहिला गुन्हा क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला. तर आता आणखी एक प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाने या दोन्ही नेत्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यात आणखी वाढ झाली आहे.

सीजेपीची हायकोर्टात धाव

न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याच्या निर्णयाला सीजेपी नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या कायदेशीर टीमने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. संबंधित याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. या खटल्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अभिजीत दिपके यांच्या भूमिकेने मोठा ट्विस्ट

तर CJP संस्थापक अभिजीत दिपके यांचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्यानुसार, पक्षाच्या आंदोलनामागील सर्व धोरणात्मक निर्णय सौरव दास आणि आशुतोष रांका हे घेत असत. ते केवळ त्यांच्या आदेशांचे पालन करत होते. सीजेपी प्रमुखांच्या या वक्तव्याने आता मोठा ट्विस्ट आला आहे. दिपके यांच्या भूमिकेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणात पोलीस आता पुढे काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!