American Tariff : युद्धविराम होताच डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा धक्का, थेट 50 टक्के टॅरिफची घोषणा, चिंता वाढली

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे. मात्र युद्धविराम होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नव्या टॅरिफची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

American Tariff : युद्धविराम होताच डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा धक्का, थेट 50 टक्के टॅरिफची घोषणा, चिंता वाढली
donald trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 08, 2026 | 6:24 PM

अखेर अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला. इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू होतं, या युद्धाचा फटका हा केवळ या तीनच देशांना बसला नाही, तर या युद्धामुळे संपूर्ण जग मोठ्या संकटात सापडलं होतं. इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केल्यामुळे जगात मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं होतं. त्यामुळे हे युद्ध लवकरात लवकर संपवावं अशी जागातील अनेक देशांची इच्छा होती. अखेर युद्धाच्या 40 व्या दिवशी इराण आणि अमेरिकेकडून युद्ध विरामाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान युद्धविरामाची घोषणा होऊन 24 तास होत नाहीत तोच आता पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केली आहे.

युद्धविराम झाल्यानंतर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, इराणमध्ये सकारात्मक सत्ता परिवर्तन झालं आहे. आमच्या 15 अटींपैकी अनेक अटी इराणने मान्य केल्या आहेत. यातील काही अटी त्यांनी आधीच मान्य केल्या होत्या. आता इराण युरेनियम संवर्धन करणार नाही. अमेरिका इराणसोबत मिळून काम करेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सोबतच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. जे देश इराणला शस्त्र पुरवतील त्यांच्याकडून 50 टक्के टॅरिफ आकारला जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी यापूर्वीच अनेक देशांवर टॅरिफ लावला आहे. टॅरिफचा मोठा फटका हा त्या देशांना बसत आहे. टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकेमध्ये निर्यात होणाऱ्या वस्तूंवर परिणाम झाला आहे. ज्या देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावला आहे, त्या देशांच्या वस्तू अमेरिकेत महाग झाल्या आहेत, त्यामुळे त्यांची अमेरिकेतली मागणी देखील कमी झाली आहे. दरम्यान याचा फटका हा अमेरिकेला देखील बसत आहे. अमेरिकेत देखील अनेक वस्तूंचा तुटवडा जाणवत असून महागाई गगनाला भीडली आहे. त्यातच आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या टॅरिफची घोषणा केली आहे.  जे देश इराणला शस्त्र पुरवरतील त्यांच्यावर 50 टक्के टॅरिफ लावला जाणार आहे.

 

Follow Us