AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ट्रम्प यांनी 90 मिनिटं आधीच केला युद्धविराम, रिपोर्टने मोठी खळबळ, …तर इराण नाही अमेरिकाच झाली असती उद्ध्वस्त

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे, मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 90 मिनिटं आधीच युद्धविरामाची घोषणा केली, या निर्णयामागे एक रिपोर्ट असल्याचं बोललं जात आहे.

मोठी बातमी! ट्रम्प यांनी 90 मिनिटं आधीच केला युद्धविराम, रिपोर्टने मोठी खळबळ, ...तर इराण नाही अमेरिकाच झाली असती उद्ध्वस्त
donald trumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 08, 2026 | 5:20 PM
Share

युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला होता. अमेरिका, इराण आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू होतं. या युद्धामध्ये केवळ अमेरिका, इराण आणि इस्त्रायलचंच नुकसान झालं नाही तर संपूर्ण जगानं मोठी किंमत मोजली आहे. या युद्धात अनेक आखाती देश उद्ध्वस्त झाले आहेत. युद्धाकाळात या देशांवर इराणकडून हल्ले करण्यात आले होते. मात्र आता पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराण आणि अमेरिकेत युद्धविराम घडवून आला आहे, इस्त्रायलकडून देखील या युद्धविरामाला पाठिंबा देण्यात आला आहे. दरम्यान युद्धविरामाच्या 24 तास आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी धमकी दिली होती. जगातील एक संस्कृती पूर्णपणे नष्ट होईल, ती आशी नष्ट होईल की पुन्हा ती अस्तित्वातच येणार नाही, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच युद्धविरामाच्या हालचालींना सुरुवात झाली.

मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे अमेरिकेने डेडलाईनच्या 90 मिनिटं आधीच युद्धविरामाची घोषणा केली. अमेरिकेनं एवढा झटपट निर्णय का घेतला याबाबतचा एक रिपोर्ट आता समोर आला आहे. या रिपोर्टने खळबळ उडाली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने याबाबतच वृत्त दिलं आहे. गेल्याच महिन्यात एफबीआयकडून अमेरिकेच्या संरक्षण विभागाला अलर्ट देण्यात आला होता, की इराणकडून अमेरिकेच्या अतंर्गत सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे, त्यानंतर अमेरिकेनं युद्धविरामाचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

रिपोर्टमध्ये काय म्हटलं आहे?

20 मार्च रोजी एफबीआयकडून अमेरिकेचा संरक्षण विभाग आणि इतर महत्त्वाच्या विभागाला इशारा देण्यात आला होता की, अमेरिकेमधील अनेक सरकारी कार्यालये, यहुदी समाजाच्या महत्त्वाच्या संस्था आणि अमेरिकेतील महत्त्वाच्या इमारती इराणच्या निशाण्यावर आहेत. इराणकडून अमेरिकेला देशांतर्गत मोठा धोका निर्माण झाला आहे. यामध्ये केवळ इराणचं स्लीपर सेलच नाही तर जे अमेरिकेमध्ये राहून अमेरिका आणि इस्त्रायलचा विरोध करतात असे देखील लोक यामध्ये सहभागी आहेत, अमेरिकेमध्ये मोठा हिंसाचार उफाळून येऊ शकतो. मात्र त्यानंतर ट्रम्प यांनी आता युद्धविरामाची घाई केल्याचं दिसून येत आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?