भाजप छत्तीसगडमध्ये सर्वच्या सर्व विद्यमान खासदारांची तिकिटं कापणार

भाजप छत्तीसगडमध्ये सर्वच्या सर्व विद्यमान खासदारांची तिकिटं कापणार

नवी दिल्ली : भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी अजून एकही यादी जाहीर झालेली नाही. भाजपच्या केंद्रीय निवड समितीला उमेदवारांची नावं निश्चित करताना दुसऱ्या बैठकीतही अडचणी येत असल्याची माहिती आहे. पण काही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील नावांचा समावेश आहे. तर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे यावेळी निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. आपण निवडणूक लढणार नसल्याचं सुषमा स्वराज यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं.

भाजपने छत्तीसगडमध्ये 15 वर्षानंतर सत्ता गमावली आहे. मध्य प्रदेशातून स्वतंत्र झालेल्या या राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 11 जागांवर भाजप नव्या उमेदवारांना संधी देणार आहे. सर्व उमेदवारांची तिकिटं कापली जाणार असून नवीन उमेदवारांना संधी देण्यात येईल, असं भाजपचे छत्तीसगडचे प्रभारी अनिल जैन यांनी सांगितलंय.

छत्तीसगडमध्ये भाजपने नुकतीच सत्ता गमावली आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी देऊन भाजपकडून नशीब आजमावलं जाणार आहे. शिवाय छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह हे देखील लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती आहे. सध्या त्यांचे चिरंजीव अभिषेक सिंह खासदार असलेल्या राजनंदगाव मतदारसंघातून रमण सिंह निवडणूक लढवू शकतात.

वाचा – मोदी वाराणसीतूनच, महाराष्ट्रात प्रितम मुंडे आणि पूनम महाजनांचं नाव निश्चित?

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *