अंदमानात अमेरिकी पर्यटकाची आदिवासींकडून बाण मारुन हत्या

अंदमानात अमेरिकी पर्यटकाची आदिवासींकडून बाण मारुन हत्या

पोर्ट ब्ले: अंदमान – निकोबार बेटावर आलेल्या अमेरिकन पर्यटकाची तिथल्या आदिवासींनी हत्या केली. निकोबारमधील सेंटिनेल बेटांवर जाण्यास मनाई असूनही, हा पर्यटक मच्छिमारांच्या मदतीने तिथल्या जंगलात घुसला. त्यामुळे आदिवासींनी त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल  केला असून, जणांना अटक केली आहे.

अंदमान निकोबारमधील सुदूर सेंटिनल बेटावर आदिवासींचा एक समूह राहतो. या समुदायाला भेटण्याची कोणालाही परवानगी नाही. मात्र अमेरिकन नागरिक जॉन एलन चाऊने अवैधरित्या या बेटावर जाऊन जंगलात प्रवेश केला होता. मच्छिमारांनी त्याला आदिवासींच्या परिसरात घुसण्यास मदत केली होती. पण आदिवासींनी त्याची हत्या केली. एलनचा मृतदेह उत्तर सेंटिनल बेटावर सापडला.

स्थानिक मच्छिमारांनी या मृतदेहाची माहिती पोलिसांना दिली.

सेंटिनल बेटावर राहणारी आदिवासींची जमात अत्यंत धोकादायक मानली जाते. इथे केवळ नाव घेऊनच जाता येतं. इथे अनेक वर्षांपूर्वीपासून आदिवासी जमात राहते. त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नाही. तिथे जाणाऱ्या बाहेरील व्यक्तींवर ही जमात हल्ला करते.

दरम्यान, चेन्नईतील अमेरिकी दुतावासाच्या प्रवक्त्याने अंदमान निकोबार बेटावर अमेरिकी नागरिकाची हत्या झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.