AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

140 कोटी लोकांना मारहाण करून… E20 पेट्रोलबाबत केजरीवालांचा गंभीर आरोप

Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल E20 पेट्रोलवर केंद्र सरकारला घेरताना पहायला मिळत आहेत. आता त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

140 कोटी लोकांना मारहाण करून... E20 पेट्रोलबाबत केजरीवालांचा गंभीर आरोप
Arvind Kejriwal on E20 FuelImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 09, 2026 | 4:18 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून देशात इथेनॉल मिश्रित इंधन म्हणजेच E20 पेट्रोलवरून वाद सुरू आहे. अनेक वाहन चालकांनी हे इंधन वाहनांसाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे. तर सरकारकडून हे इंधन वाहनांना कोणतेही नुकसान पोहोचवत नसल्याचे सांगितले जात आहे. या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल केंद्र सरकारला सातत्याने घेरत आहेत. काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी E20 च्या विरोधात पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत पायी मोर्चा काढला होता. आता त्यांनी एका विनोदाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. केजरीवाल यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

अरविंद केजरीवाल यांचा सरकारवर निशाणा

अरविंद केजरीवाल यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी म्हटले की, ‘आपल्या देशात E20 कशाप्रकारे लागू केले जात आहे, हे मी तुम्हाला एका विनोदातून समजावून सांगतो.’ त्यानंतर केजरीवाल यांनी विनोद सांगण्यास सुरुवात केली. केजरीवाल म्हणाले की, ‘एकदा अमेरिका, रशिया आणि भारत या तीन देशांच्या पोलिसांमध्ये स्पर्धा होते. जंगलात एक सिंह सोडला जातो आणि तिन्ही देशांच्या पोलिसांना तो शोधून आणण्यास सांगितले जाते.’

काय म्हणाले केजरीवाल?

केजरीवाल पुढे म्हणाले, सर्वप्रथम ट्रम्प यांचे पोलीस जंगलात गेले आणि 24 तासांत सिंहाला शोधून आणले. त्यानंतर पुतिन यांचे पोलीस गेले आणि त्यांनी एका तासात सिंहाला शोधून आणले. मात्र, मोदीजींच्या पोलिसांना पाठवण्यात आल्यानंतर ते तीन दिवस परतले नाहीत. त्यानंतर सर्वजण जंगलात गेले, तेव्हा मोदीजींचे पोलीस एका कुत्र्याला पकडून त्याला बेदम मारहाण करताना दिसले. ते त्याला म्हणत होते… सांग, मी सिंह आहे.’ केजरीवाल यांनी या विनोदाचा संबंध E20 पेट्रोलशी जोडताना म्हटले की, ‘सध्या सरकारने देशाचीही अशीच अवस्था केली आहे. 140 कोटी लोकांना मारहाण करत आहेत आणि म्हणत आहेत… सांग, E20 योग्य आहे.”

अरविंद केजरीवाल गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने E20 पेट्रोलला विरोध करत आहेत. अलिकडेच त्यांनी नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ‘नॅशनल टाउन हॉल अगेंस्ट E20’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी दावा केला होता की, ‘E20 मुळे केवळ वाहनांचे मायलेज कमी होत नाही, तर वाहनांचे पार्ट्सही खराब होत आहेत.’

केजरीवालांच्या 3 मागण्या

केजरीवाल यांनी केंद्र सरकारसमोर तीन मागण्या केल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे, ‘देशातील सर्व पेट्रोल पंपांवर E20 इंधनासोबत शुद्ध पेट्रोलचा पर्यायही उपलब्ध करून द्यावा. दुसरी मागणी म्हणजे, ‘इथेनॉल मिश्रित E20 इंधनाची किंमत शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी असावी. तिसरी मागणी म्हणजे, पेट्रोलची किंमत प्रति लिटर 84 रुपयांपेक्षा कमी असावी.’

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत