Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेंची 4 शब्दांची पोस्ट, रांका, सौरभ दास यांना जामीन मिळताच खिजवलं!

आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आता ते तुरुंगाच्या बाहेर आले आहेत. आता पुन्हा एकदा ते सीजेपीचे काम सक्रियपणे करणार आहेत. ते बाहेर येताच अभिजीतने रांका आणि दास यांचे दोन फोटो पोस्ट केले आहेत.

Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेंची 4 शब्दांची पोस्ट, रांका, सौरभ दास यांना जामीन मिळताच खिजवलं!
abhijeet dipke and cjp
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2026 | 10:49 PM

CJP Abhijeet Dipke : कॉकरोच जनता पार्टीचे सहसंयोजक आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना जामीन मंजूर झाला आहे. स्पेशल एक्झिक्यूटिव्ह मॅजिस्ट्रेट (SEM) यांनी हा जामीन मंजूर केला आहे. गेल्या सात दिवसांपासून ते तिहाड येथील तुरुंगात होती. आशुतोष रांका, सौरभ दास तसेच सीजेपीच्या इतर कार्यकर्त्यांनी आंदोलनास बंदी असलेल्या जंतर-मंतरच्या मैदानावर जाऊन तिरंगा फडकवला होता. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, आता हे दोघेही बाहेर आल्यानंतर सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी त्यांच्या समाजमाध्यमावर दोन फोटो पोस्ट केले आहेत. त्यांनी हे फोटो पोस्ट करून एका प्रकारे सत्ताधाऱ्यांना खिजवले आहे.

रांका आणि सौरभ दास यांच्यासोबत व्हिडीओ कॉल

आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आता ते तुरुंगाच्या बाहेर आले आहेत. आता पुन्हा एकदा ते सीजेपीचे काम सक्रियपणे करणार आहेत. ते बाहेर येताच अभिजीतने रांका आणि दास यांचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ते एका कारमध्ये बसल्याचे दिसत आहे. तसेच बाहेर अंधार आहे. फोटोमध्ये रांका आणि सौरभ दास दोघेही हसत आहेत. तर फोटोमध्ये उजव्या बाजूला खाली स्वत: अभिजीत दीपके दिसत आहेत. दीपके रांका आणि सौरभ दास यांच्याशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून गप्पा मारताना दिसत आहेत.

Loading...

रांका, सौरभ दास बाहेर, आता पुढे काय?

हा फोटो पोस्ट करताना दीपके यांनी चार शब्दांचे कॅप्शन दिले आहे. ‘मस्त थांबायला नको’ असं त्यांनी या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. सीजेपीचे दोन महत्त्वाचे नेते असलेले रांका आणि सौरभ दास हे गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात होते. त्यांना जामीन मिळावा यासाठी जीजेपीकडून पूर्ण ताकदीने न्यायालयात बाजू मांडली जात होती. ते बाहेर येणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

परंतु ते दोघेही आता बाहेर आलेत. म्हणजेच कितीही संकटं आली तरी आम्ही डगमगणार नाही. आमचा लढा चालूच राहील. आमची मस्ती सुरूच राहील, असं अभिजीत दीपके यांना सूचवायचं आहे, असं सांगितलं जातंय. दरम्यान आता आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना जामीन मिळाल्यानंतर सीजेपीची पुढची योजना काय असणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us