बागेश्वर बाबाच्या भावाचा मोठा कांड, पोलिसांनी तडकाफडकी बेड्या ठोकल्या; मोठी खळबळ

मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यात बागेश्वर महाराज यांचा भाऊ शालिग्राम गर्ग याला अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्यासोबतच अंकित मिश्रा नावाच्या व्यक्तीलाही बेड्या ठोकल्या आहे. त्याने शालिग्राम गर्ग याने गोळीबार केल्याचा आरोप आहे.

बागेश्वर बाबाच्या भावाचा मोठा कांड, पोलिसांनी तडकाफडकी बेड्या ठोकल्या; मोठी खळबळ
bageshwar baba
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 15, 2026 | 6:59 PM

Bageshwar Baba : आज बागेश्वर बाबा यांना संपूर्ण देश ओळखतो. त्यांचा जेव्हा दरबार भरतो, तेव्हा शेकडो लोक गर्दी करतात. महाराष्ट्रातही त्यांचा अनेक ठिकाणी दरबार भरलेला आहे. त्यांनी केलेल्या काही विधानांमुळे ते अनेकदा वादात सापडलेले आहेत. दरबार भरल्यानंतर अनेकवेळा चमत्काराचे दावे केल्यानेही त्यांच्यावर वेळोवेळी आक्षेप घेण्यात आलेला आहे. दरम्यान, आता हेच बागेश्वर बाबा आता नव्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा भाऊ शालिग्राम गर्ग उर्फ सौरव याला पोलिसांनी अटक केलं आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे माझ्या भावाला कठोरातील कठोर शिक्षा द्या, असे खुद्द बागेश्वार बाबा म्हणाले आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यात बागेश्वर महाराज यांचा भाऊ शालिग्राम गर्ग याला अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्यासोबतच अंकित मिश्रा नावाच्या व्यक्तीलाही बेड्या ठोकल्या आहे. त्याने शालिग्राम गर्ग याने गोळीबार केल्याचा आरोप आहे. जमिनीच्या वादातून त्याने हे कृत्य केल्याचा दावा केला जात आहे. याच प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी शालिग्राम गर्ग याला अटक केली आहे. राजनगर पोलीस ठाण्याने ही कारवाई केली आहे. अॅडिशनल एसपी आदित्य पटेल यांनीदेखील या अटकेची पुष्टी केली आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.

बागेश्वार बाबा नेमकं काय म्हणाले?

शालिग्राम गर्ग याच्यावर अटकेची कारवाई झाल्यनंतर बागेश्वर महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा आणि शालिग्राम गर्ग यांचा कसलाही संबंध नाही. माझा तसेच माझ्या कुटुंबाचाही काही संबंध नाही. संपूर्ण जगच माझे कुटुंब आहे, असे स्पष्टीकरण बागेश्वर बाबा यांनी दिले. तसेच, मी समाज, राष्ट्र, सनातनसाठी जगतो. छतरपूर जिल्हा खूप मोठा आहे. या जिल्ह्यात नेहमी काहीतरी घडतच असते. या प्रकरणात तो दोषी असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. आरोप खरे असतील तर न्यायालयाने त्याला कठोर शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणीही बागेश्वर बाबा यांनी केली.

Follow Us