AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bageshwar Baba: ‘छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले अन् रामदास स्वामींना…’ बागेश्वर बाबाने अकलेचे तारे तोडले, त्या वक्तव्याने मोठा वाद

Bageshwar Baba on Chhatrapati Shivaji Maharaj: नागपूरमध्ये भारतदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उपाख्य बागेश्वर बाबा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर त्यांनी अजून एका वादाला फोडणी दिली.

Bageshwar Baba: 'छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले अन् रामदास स्वामींना...' बागेश्वर बाबाने अकलेचे तारे तोडले, त्या वक्तव्याने मोठा वाद
छत्रपती शिवराय, बागेश्वर बाबाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 25, 2026 | 8:41 AM
Share

Bageshwar Baba on Chhatrapati Shivaji Maharaj: “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले,स्वामी रामदास महाराज जवळ गेले,आता युद्ध लढणार नाही असे सांगितले,राजपाट सांभाळण्यास सांगितले . रामदास स्वामींनी सांगितले की ठीक आहे. शिष्य हा गुरुचे मानतो, त्यामुळे आजपासून राज्य तुम्हाला चलवावे लागेल.” असे वक्तव्य करून बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उपाख्य बागेश्वर बाबा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. ह वाद ताजा असतानाच त्यात बागेश्वर बाबाची भर पडली आहे. काल नागपूरमध्ये भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री बोलत होते.

या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि संत मंडळी उपस्थित होते. आज भारतीय सनातन धर्माला आणखी जास्त गौरव होत आहे, भारत दुर्गा मंदिराचे भूमिपूजन झाले आहे. संघ प्रमुखांनी भारताला विश्व पटलावर स्थापन करण्यासाठी जीवन दिले. भारत माता, दुर्गा मातेचा संकल्प आला. भारत मातेने निवडले आहे. यातील देवशक्तींनी हा विचार केला असेल, केवळ एकमात्र भारत आहे जिथे भारत मातेचा जयकार लावला जातो. भारताच्या गौरवला पुन्हा स्थापित करण्यासाठी संघ प्रमुखांनी विडा उचलला . जेंव्हा भारतात कुठे आपत्ती येते तेंव्हा आरएसएस स्वयंसेवक तिथे जाऊन मदत करतो , असे बागेश्वर बाबा म्हणाले.

त्या वक्तव्याने खळबळ

“छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना खूप थकले, म्हणजे त्यांना वाटलं की, आपण थकलो. एक दिवस ते रामदास स्वामी यांच्याकडे गेले. त्यांनी मुकूट उतारला आणि खाली ठेवला. आता आपल्याला युद्ध लढायचे नाही. हा मुकूट आपण सांभाळा, हा राजपाट आपण सांभाळा. आपल्या आज्ञेने आम्ही चाललो. आमच्याकडून युद्ध लढलं जात नाही. आम्ही खूप थकलो आहोत. आता आम्हाला आराम हवा. आम्हाला विश्राम हवा. काही दिवस आम्ही काहीच करू इच्छित नाही.” असे वक्तव्य बागेश्वर बाबांनी केले.

“शिवरायांनी मन मोकळं केल्यावर रामदास स्वामी यांनी स्मितहास्य केले. ते म्हणाले की, ठीक आहे. तुम्ही आमचे कोण आहात? शिवाजी महाराज म्हणाले की आपले शिष्य आहोत. मग आम्ही कोण आहोत. तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले की तुम्ही आमचे गुरू आहात. मग शिष्याचं कर्तव्य काय? असा सवाल रामदास स्वामी यांनी विचारला. त्यावर जो गुरू आज्ञा देणार त्याचं पालन करण हे शिष्याचं कर्तव्य असल्याचे रामदास स्वामी म्हणाले. रामदास स्वामी यांनी मुकूट उचलला आणि महाराजांच्या डोक्यावर ठेवला. आजपासून माझं राज्य आहे. मी राज्य चालवणार. तुम्हाला संचालन करायचं आहे.” असे वक्तव्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी या कार्यक्रमात केले. तर चार मुलं जन्माला घाला आणि त्यातील एक स्वयंसेवक संघाला द्या, असे आवाहन त्यांनी केले.

Follow Us
पाऊस पडतोय तरी पाणीटंचाई का? मुंब्र्यात पाण्यासाठी MIMचा संताप
MIM Protest In Thane | पाऊस पडतोय तरी पाणीटंचाई का? मुंब्र्यात पाण्यासाठी MIMचा संताप; ठाणे महापालिकेसमोर मडकी फोडत निषेध
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः घडवली गणपतीची मूर्ती! पर्यावरणपूरक...
CM Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतः घडवली गणपतीची मूर्ती! 6,500 विद्यार्थ्यांसमोर दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश
अण्णा हजारे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर
अण्णा हजारे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर
आपल्या मुलींना वेद, पुराणे, गीता आणि... अमृता फडणवीसांचं पुन्हा मोठं..
आपल्या मुलींना वेद, पुराणे, गीता आणि... अमृता फडणवीसांचं पुन्हा मोठं विधान, काय म्हणाल्या?
साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र... मनोज जरांगे
साडीचोळी घेऊन अमृता ताईंकडे जेवायला जाणार, मात्र... मनोज जरांगेंच्या या वक्तव्याने वेधलं लक्ष
संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण...
संजय राऊत तातडीने घेणार शिंदे गटातील खास मंत्र्याची भेट, मोठं कारण समोर
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क ठोसा...
महिलेनं इतकं हाणलं की फळवाल्याचा जागीच गेला जीव, चक्क... चकित करणारं कारण समोर
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तेरावा दिवस, सरकारच्या हालचालींना वेग
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव...
ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुखांची यादी जाहीर; 40 मतदारसंघांपैकी हे नाव तुफान चर्चेत
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, वडिलांचा जबाब...
दिशा सालियन प्रकरणात सीबीआयचा तपास सुरू, तिच्या वडिलांचा जबाब... नेमकं काय घडणार?