AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zen Sadavarte: गेट आऊट म्हणणाऱ्या महिलेविरोधात झेन सदावर्ते मैदानात!भाजप मोर्चात घातला होता राडा, आता होणार कारवाई?

Zen Sadavarte filed Police Complaint: जांभोरी मैदान परिसरात भाजपच्या जनआक्रोश मोर्चामुळे ट्रॅफिक जॅम झाला होता. त्यामुळे संतापलेल्या एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात आरडाओरड केली. आता त्या महिलेविरोधात झेन सदावर्ते हिने पोलिसात धाव घेतली आहे.

Zen Sadavarte: गेट आऊट म्हणणाऱ्या महिलेविरोधात झेन सदावर्ते मैदानात!भाजप मोर्चात घातला होता राडा, आता होणार कारवाई?
झेन सदावर्तेImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 24, 2026 | 10:41 AM
Share

Zen Sadavarte filed Police Complaint: मुंबईतील जांभोरी मैदान परिसरात नारी वंदन विधेयक नामंजूर झाल्याविरोधात भाजपने जनआक्रोश मोर्चा काढला. त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली. त्याचा संताप एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांच्यावर काढला. गेट आऊट म्हणत तिने मोर्चेकरांना सुनावले. पण मंत्री महाजन यांनी हे प्रकरण सामोपचाराने मिटवले. या महिलेच्या संतापावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आता गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिने या महिलेविरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली आहे. त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

गेट आऊट

जांभोरी मैदान परिसरात संध्याकाळी भाजपने मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चाचे नेतृत्व गिरीश महाजन यांनी केले. या मोर्च्यासाठी रीतसर परवानगी घेण्यात आली होती. पण हमरस्त्यावर त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यात एका महिलेचा मुलगा ही अडकला. त्यामुळे ती महिला संतप्त झाली. तिने यावेळी मोर्चेकरांना आणि मंत्री गिरीश महाजन यांना वाहतूक मोकळी करण्याविषयी सुनावले. तिने या मोर्चात राडा घातला. पाण्याची बाटली फेकून मारली होती. तिचा संताप सर्व देशाने पाहिला. पण हे प्रकरण महाजनांनी अत्यंत सौम्यपणे हाताळले. त्यांनी सर्वांनाच शांत केले आणि तिथून ते मोर्चा स्थळाकडे निघाले.

आता झेन सदावर्ते मैदानात

भाजप मोर्चाता राडा करणाऱ्या महिलेविरोधात दोन्ही बाजूंनी मतमतांतरे उमटली. काहींनी तिचा त्रागा योग्य वाटला. मोर्चासाठी जनतेला वेठीस धरणे योग्य नसल्याचे म्हटले तर काहींना तिचा आक्रस्तळेपणा आवडला नाही. दरम्यान आता या राडा घालणाऱ्या महिलेविरोधात झेन सदावर्ते मैदानात उतरली आहे. तिने वरळी पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात तक्रार दिली आहे.

ही महिला तिच्या मर्सिडीजमधून उतरून मोर्चात व्यत्यय आणत होती. ती मोर्चेकरांना असभ्य भाषेत बोलत होती. शट अप, डोन्ट टॉक टू मी, गेट आऊट हे अपमानजनक शब्दांचा वापर करत होती. आपण वरळी पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल केली आहे. सदर महिलेविरोधात पोलिसांनी कारवाई करावी अशी विनंती आपण केल्याचे झेन सदावर्ते हिने स्पष्ट केले.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...