AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनच्या पैशाने समोसा, पाकिस्तानकडून चहा, आता हे चालणार नाही; सुप्रिया सुळेंनी फटकारले

खासदार सुप्रिया सुळे यांनी जंतरमंतर विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कारवाईवरून केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. "चीनच्या पैशाने समोसा, पाकिस्तानकडून चहा... आता हे चालणार नाही," अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. पेपरफुटीविरोधी विधेयकावरील चर्चेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कांचा मुद्दा मांडत शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवरही आवाज उचलला.

चीनच्या पैशाने समोसा, पाकिस्तानकडून चहा, आता हे चालणार नाही; सुप्रिया सुळेंनी फटकारले
supriya suleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 28, 2026 | 6:58 PM
Share

जंतरमंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं थेट पाकिस्तानशी कनेक्शन जोडल्या गेलं आहे. त्यामुळे देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. आज त्याचे पडसाद संसदेत उमटले. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारला चांगलंच घेरलं. चीनच्या पैशाने समोसा, पाकिस्तानकडून चहा… आता हे चालणार नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला फटकारलं आहे.

संसदेत अँटी पेपर लीक बिल सादर करण्यात आलं. या बिलावरील चर्चेत भाग घेताना सुप्रिया सुळे यांनी जंतरमंतरवरील हल्ल्यावरून सरकारला धारेवर धरलं. जंतरमंतरवर ज्या आयांची मुलं गेली होती, त्यांच्या मनाला काय वाटलं असेल? जरा विचार करा. मीही एक आई आहे. राजकीय लढाई आपण बाहेरही लढू. पण हा विषय विद्यार्थ्यांचा आहे, असं सांगतानाच त्यांनी शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाला कोट केलं. त्या म्हणाल्या, बघा तुमच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आली. तुमचे सहकारीही म्हणत आहेत की धर्मेंद्र प्रधान यांनी 15 दिवसांपूर्वीच राजीनामा दिला असता तर आज ही परिस्थिती आली नसती, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. किमान तुम्ही मुरली मनोहर जोशींचं ऐकायला हवं होतं, असा चिमटाही त्यांनी काढला.

बुलेट ट्रेनने शिकायला गेलो नाही

सुप्रिया सुळे यांनी यावेळी शिक्षण व्यवस्थेवरून सरकारला पूर्णपणे घेरलं. तेव्हा ट्रेजरी बँचवरून एकाने काही तरी विचारलं. त्याला सुप्रिया सुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आम्ही शिकलो, तेव्हा वीजही होती. रस्तेरही होते. ट्रेन पण वेळेवर यायची. आम्ही बुलेट ट्रेनने शिकायला गेलो नाही. तेव्हाही रस्ते होते. कदाचित तुम्ही रस्त्याचं रुंदीकरण केलं असेल. त्यातही आमच्या गरीब शेतकऱ्यांची जमीन गेली, असा हल्लाच सुप्रिया सुळेंनी चढवला.

ती ताकद त्या मुलीत

यावेळी त्यांनी जंतरमंतवरील लाठीचार्जची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. कुणी ऑर्डर दिली हे मी नाही विचारत. समोसा चीनच्या पैशाने, चहा पाकिस्तानच्या पैशाने आली, हे सर्व आता चालणार नाही, असंही त्या म्हणाल्या. यावेळी महाराष्ट्र पोलिसांच्या व्हॅनसमोर उभं राहणाऱ्या एका मुलीचाही त्यांनी उल्लेख केला. आपण मुलींना ज्यासाठी शिकवलं, ती ताकद त्या मुलीमध्ये आहे, असं त्या म्हणाल्या.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती