AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर नीट परीक्षेत सर्वात मोठे बदल, श्रीकांत शिंदेंनी सूचवला एक पर्याय ज्याची देशात चर्चा; संसदेत काय म्हणाले?

Shrikant Shinde : शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नीट परीक्षेवर भाष्य केले आहे. त्यांनी नीट परीक्षा वर्षातून केवळ एकदा न घेता अनेकदा घेण्याचा पर्याय सुचवला आहे.

तर नीट परीक्षेत सर्वात मोठे बदल, श्रीकांत शिंदेंनी सूचवला एक पर्याय ज्याची देशात चर्चा; संसदेत काय म्हणाले?
Sheikant Shinde on NeetImage Credit source: X
| Updated on: Jul 28, 2026 | 6:55 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपरफुटीविरोधात केलेले आंदोलन यशस्वी झाले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. अशातच आता संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेत आज नीट पेपरफुटी प्रकरणी चर्चा झाली. यावेळी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी नीट परीक्षेवर भाष्य केले आहे. त्यांनी नीट परीक्षा वर्षातून केवळ एकदा न घेता अनेकदा घेण्याचा पर्याय सुचवला आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये – शिंदे

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, ‘आम्ही तरुणांच्या आक्रोशाला केवळ आंदोलन मानत नाही, तर बदलाची सुरुवात मानतो. कोणतीही परीक्षा तुमचे संपूर्ण आयुष्य ठरवत नाही. परीक्षेत अपयश आले तरी कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी स्वतःच्या आयुष्याचा आणि देशाचा विचार करायला हवा. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घ्यावी. अवघ्या 16 व्या वर्षी त्यांनी किल्ला जिंकून अटकेपासून कटकपर्यंत मराठा साम्राज्याच्या पायाभरणीला सुरुवात केली होती.

नैतिकतेमुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला

पुढे बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, ‘आम्ही केवळ या प्रकरणाचा निषेध केला नाही, तर संपूर्ण व्यवस्था सुधारण्याचे काम केले आहे. सरकारमध्ये नैतिकता असल्यामुळेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना शक्य तितक्या लवकर शिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची तरतूद या विधेयकाद्वारे करण्यात येत आहे.’

विद्यार्थ्यांना वर्षातून अनेकदा नीट परीक्षा देण्याची संधी मिळावी…

खासदार शिंदे यांनी पुढे बोलताना म्हणाले की, ‘आमचे उद्दिष्ट केवळ गुन्हेगारांना पकडणे नाही, तर विद्यार्थ्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाचवणेही आहे. विद्यार्थ्यांची अनेक वर्षांची मेहनत आणि कुटुंबाचे कष्ट केवळ तीन तासांच्या परीक्षेवर कसे ठरवता येतील? त्यामुळे ही परीक्षा व्यवस्था बदलण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना वर्षातून अनेक वेळा परीक्षा देण्याची संधी मिळाली पाहिजे. अमेरिकेसारख्या देशांमध्ये विद्यार्थ्यांना वर्षातून अनेकदा परीक्षा देता येते. अशाच प्रकारची व्यवस्था भारतातही लागू करण्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक सुधारणा आवश्यक आहेत.’

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार