India-Bangladesh : बॉर्डरवर बांग्लादेशी फोर्सची मुजोरी, भारताच्या BSF आणि BGB मध्ये घुसखोरावरुन जोरदार राडा VIDEO

India-Bangladesh : अलीकडच्या काळात बांग्लादेशची दादागिरी वाढत चालली आहे. बांग्लादेशातील सरकार भारतविरोधी अनेक निर्णय घेत आहे. त्याचवेळी सीमेवर तैनात असलेली बांग्लादेशी फोर्स सुद्धा मुजोरी दाखवत आहे. घुसखोरीच्या एका प्रकरणात हेच दिसून आलय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय.

India-Bangladesh : बॉर्डरवर बांग्लादेशी फोर्सची मुजोरी, भारताच्या BSF आणि BGB मध्ये घुसखोरावरुन जोरदार राडा VIDEO
BSF vs BGB
Image Credit source: Screengrab
| Updated on: Jun 11, 2026 | 10:40 AM

भारतात बांग्लादेश सीमेवरुन घुसखोरी चालते. ही घुसखोरी बंद करण्यासाठी अलीकडे भारताने अनेक पावलं उचलली आहेत. नुकताच BSF ने भारतातील घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. पण बांग्लादेश फोर्स त्या घुसखोराला परत घ्यायला तयार नाहीय. मेघालय सीमेवर बॉर्डर सिक्योरिटी फोर्स BSF आणि BGB मध्ये जोरदार वादावादी झाली. मेघालयमध्ये बांग्लादेशची सीमा भारताला लागून आहे. मेघालयच्या साऊथ वेस्ट गारो हिल्स जिल्ह्यात महेंद्रगंज येथे नंदिरचरमध्ये भारत-बांग्लादेश बॉर्डरवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हद्दीत बेकायद पद्धतीने घुसखोरी करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकाला परत आपल्या देशात घ्यायला बांग्लादेशी अधिकाऱ्यांनी नकार दिला. रिपोर्ट्सनुसार हा माणूस मेघालय बॉर्डरवरुन बेकायद पद्धतीने भारतात घुसला होता. BSF ने त्याला ताब्यात घेतल्यानंतर स्टँडर्ड प्रोसीजरनुसार, बांग्लादेशी सीमेवर परत पाठवून दिलं.

या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात बांग्लादेश BGB आणि BSF जवानांमध्ये त्या व्यक्तीची नागरिकता आणि ओळख यावरुन वादावादी सुरु असलेली दिसतेय. बॉर्डर गार्ड बांग्लादेशने BGB त्या व्यक्तीला पुन्हा आपल्या देशात घ्यायला नकार दिला. त्यानंतर तो व्यक्ती ‘नो-मॅन्स लँड’ अडकला आहे. या घटनेनंतर काही वेळाने बॉर्डरवर तणाव वाढला. BSF आणि BGB मधल्या शाब्दीक वादावादीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. BSF सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीला ताब्यात घेण्याआधी बेकायद पद्धतीने तो भारतीय हद्दीत दाखल झाला होता. कथित घुसखोर बांग्लादेश राजशाहीचा राहणार असून त्याचं वय 55 आहे. तो एक हिंदू आहे. सती राजबंशी असं त्याचं नाव आहे. राजशाही जिल्ह्याच्या चालाना गावचा तो रहिवाशी आहे.

बेकायद घुसखोरांविरोधात मोठ्या प्रमाणात मोहिम

बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (BSF) आणि बॉर्डर गार्ड बांग्लादेश (BGB) यांच्या फ्लॅग मीटिंग झाल्यानंतरही या विषयावर तोडगा निघाला नाही. सती राजबंशी सध्या नो मॅन्स लँडमध्ये फसले आहेत. असममध्ये ओळखपत्र नसलेल्या बांग्लादेशी घुसखोरांविरोधातील मोहिमेला वेग देण्यात आला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा वारंवार सांगत आहेत की, बेकायद घुसखोरांविरोधात अजून कठोर पावलं उचलली जातील. पश्चिम बंगाल, आसाम या राज्यात बेकायद घुसखोरांविरोधात मोठ्या प्रमाणात मोहिम सुरु आहे.

 

Follow Us