मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, एक 5 ओळीचं पत्र अन् थेट बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, घडामोडींना वेग

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये भाजपला काही धक्के देखील बसले आहेत. आता राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, एक 5 ओळीचं पत्र अन् थेट बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, घडामोडींना वेग
भाजपला धक्का
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 21, 2026 | 9:43 PM

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला चांगलं यश मिळालं होतं. भाजप हा लोकसभा निवडणुकीमध्ये देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपाचे सर्वाधिक खासदार निवडून आले. त्यानंतर भाजपने एनडीएमधील घटक पक्षांच्या मदतीने केंद्रात सरकार स्थापन केलं. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विविध राज्यांमधील निवडणुकांमध्ये देखील भाजपला चांगलं यश मिळालं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये देखील भाजपनं ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेसचा पराभव केला. आसामध्ये देखील भाजपचीच सत्ता आली. दरम्यान लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकापाठोपाठ भाजपला चांगलं यश मिळाल्याने इतर पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांचा ओघ वाढला. इंडिया आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

मात्र याचा परिणाम असा झाला की, इंडिया आघाडीमधून नेते भाजपमध्ये आल्याने मुळचे भाजपचे असलेल्या काही नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण दिसून येत आहे. आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यातील बिसौली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजप नेते कुशाग्र सागर यांनी पक्षातील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपण भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.

Loading...

पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले?

मी पक्षात प्रदीर्घ काम केलं, परंतु मला माझ्या अपेक्षेनुसार सन्मान मिळाला नाही. त्यामुळे कुठेतरी मनाला वेदना झाल्या, भाजपला सोडणं हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता. एखाद्या पक्षात जेव्हा आपण 11 वर्ष काम करतो तेव्हा त्या पक्षासोबत एक भावनात्मक नातं तयार होतं. माझ्या वैयक्तिक आयुष्यात काही अडचणी होत्या, परंतु तरी देखील मी पूर्ण निष्ठेन पक्षाचं काम केलं. माझ्या पूर्ण ताकदीने पक्षाचं संघटन कसं वाढेल यासाठी प्रयत्न केले. मी भाजपलाच आपलं कुटुंब मानलं होतं. मला सर्वांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, असं कुशाग्र सागर यांनी म्हटलं आहे. दरम्यान ते आता सपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us