AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतावर परदेशातून पैशांचा पाऊस, चीन आणि पाकिस्तानला झटका

गेल्या 15 दिवसात परदेशी गुंतवणूकदारांची पसंती भारतावर वाढली आहे. कारण परदेशी गुंतवणूकदार भारतावर विश्वास व्यक्त केला आहे. अमेरिका, युरोपसह आखाती देशातून देखील भारतात मोठा गुंतवणूक होत आहे. यामुळे चीन आणि पाकिस्तानला मोठा झटका लागला आहे.

भारतावर परदेशातून पैशांचा पाऊस, चीन आणि पाकिस्तानला झटका
पंतप्रधान नरेंद्र मोदी  लोकप्रियतेच्या बाबतीत भारतातच नाही तर जगात पहिल्या स्थानावर आहे. या वर्षी G-20 शिखर परिषदेचे यजमान भारत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं यशस्वपणे आयोजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक वेगळी ओळख यावेळी संपूर्ण जगाने पाहिली. या वर्षाच्या अखेरीस झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने तीन राज्यांत सत्ता मिळवली आहे. या यशाचे श्रेय पंतप्रधान मोदींनाच जाते. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. नरेंद्र मोदी यांनी मॉर्निंग कन्सल्टच्या मान्यता रेटिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ते जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत.
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 18, 2023 | 5:42 PM
Share

Foreign Investment : भारताचा शेअर बाजार सध्या उच्चांकावर आहे. यामध्ये परदेशी गुंतवणूकदारांचा मोठा वाटा आहे. गेल्या 15 दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांनी 52 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. तर 2023 मध्ये परदेशातून 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे. अमेरिका आणि युरोपातील देशांमधून भारतात गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे चीनला ही धक्का बसला आहे. संपूर्ण जगातून भारतात गुंतवणूक वाढत असताना पाकिस्तानलाही रडण्याची वेळ आली आहे.  सौदी अरेबिया, यूएई यांच्यासह इतर आखाती देशातून ही भारतात गुंतवणूक वाढत आहे. आयपीएल आणि देशातील इतर प्रकल्पांमध्ये पैसा गुंतवला जात आहे.

15 दिवसांत सुमारे 52 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

गेल्या १५ दिवसांत परदेशातून भारतात मोठी गुंतवणूक झाली आहे.  डिसेंबर महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत भारतीय बाजारपेठेत सुमारे 52 हजार कोटी रुपये म्हणजेच 6.23 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. ज्यामध्ये 42,733 कोटी रुपये थेट इक्विटीमध्ये गुंतवले गेले आहेत. तर कर्ज बाजारात 8,937 कोटी रुपये गुंतवले गेले. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी डेटानुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) डिसेंबरच्या पहिल्या 15 दिवसांत गुंतवलेली रक्कम हा एक विक्रम आहे.

जूनचा विक्रम मोडणार का?

आता उर्वरित 15 दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक नक्कीच वाढेल. यानंतर जून 2023 चा विक्रम मोडणार का हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. चालू वर्षात जून 2023 मध्ये, विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत इक्विटी आणि कर्ज या दोन्हीसह सर्वाधिक 56,258 गुंतवणूक केली होती. इक्विटीमध्ये 47,148 कोटी रुपये आणि कर्जामध्ये 9,178 कोटी रुपयांची गुंतवणूक होती. डिसेंबर महिन्यात हा विक्रम मोडीत निघू शकतो. विशेष बाब म्हणजे संपूर्ण वर्षात केवळ 4 महिने असे असतात ज्यात विदेशी गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे काढले.

कोणत्या महिन्यात किती पैसे गुंतवले गेले?

विशेष बाब म्हणजे 2023 मध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी देशाच्या बाजारपेठेत 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. 6 वर्षांनंतर परदेशी गुंतवणूकदारांनी एका वर्षात भारतात 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्या 10 वर्षात ही तिसरी वेळ आहे की परदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक 2 लाख कोटींच्या पुढे गेली आहे. सन 2014 मध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असताना विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत एकूण 2.56 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. पहिल्या कार्यकाळात म्हणजे 2017 मध्ये पुन्हा एकदा विदेशी गुंतवणूकदारांच्या भारतावर प्रेमाचा वर्षाव झाला आणि 2 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक झाली. गेल्या 10 वर्षात केवळ तीन वर्षे अशी झाली आहेत जेव्हा विदेशी गुंतवणूकदारांनी आपला पैसा बाजारातून बाहेर काढला आहे. ज्यामध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी 2022 मध्ये, त्यापूर्वी 2018 आणि 2016 मध्ये त्यांचे पैसे काढले आहेत.

10 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड

परदेशी गुंतवणूकदारांची वर्षभराची गुंतवणूक (कोटी रुपयांमध्ये) ( NSDL ) 2023 (15 डिसेंबरपर्यंत) 2,04,312 2022 – 1,32,815 2021 – 50,089 2020 – 1,03,156 2019 – 1,35,995 2018 – 80,919 2017  – 2,00,048 2016 – 23,081 2015 – 63,657 2014 – 2,56,214

चीन आणि पाकिस्तानमध्ये घसरण

चीनच्या शेअर बाजारांमध्ये सतत घसरण सुरु आहे. परदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक सातत्याने घसरत आहे.चालू वर्षात शांघाय निर्देशांक सुमारे 6 टक्क्यांनी घसरला आहे. हाँगकाँगचा हँग सेंग 17.45 टक्क्यांनी घसरला आहे. चीनच्या दोन्ही निर्देशांकांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा ओघ सातत्याने कमी होत आहे. परदेशी गुंतवणूकदारही सातत्याने पैसे काढून घेत आहेत, त्यामुळे चिनी बाजारात घसरण पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानचा रुपया घसरला

पाकिस्तानमध्ये तर परस्थिती खूप बिकट आहे. पाकिस्तान पैशांसाठी कधी आखाती देशांसमोर तर कधी IMF आणि जागतिक बँकेसमोर उभा राहतो. पाकिस्तानची बाजारपेठ भारत, चीन, जपान, कोरिया इत्यादी देशांपेक्षा खूपच लहान आहे. पाकिस्तानचा रुपया डॉलरच्या तुलनेत लक्षणीयरीत्या घसरला आहे. सप्टेंबर तिमाहीत पाकिस्तानमध्ये FPI गुंतवणूक फक्त 9 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 253 कोटी पाकिस्तानी रुपये आहे. जे भारताच्या तुलनेत खूपच कमी आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...