भारताचा अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, जागतीक व्यापार क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी, थेट इराणसोबत…

अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धात इराणंच प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र त्यानंतर आता भारताने एक असा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वप्नाला थेट सुरुंग लागणार आहे.

भारताचा अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, जागतीक व्यापार क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी, थेट इराणसोबत...
भारताचा अमेरिकेला धक्का
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 31, 2026 | 8:34 PM

अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही युद्ध सुरूच आहे. या युद्धावर अद्याप कोणताही तोडगा निघू शकलेला नाहीये. अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. दुसरीकडे इराणकडून देखील अमेरिकेची सैन्य तळं असलेल्या मध्यपूर्वेतील देशांवर हल्ले करण्यात येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने धमकी देऊन इराणवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढंच नाही तर जो देश इराणसोबत कोणतीही ट्रेड डील करेल तो देश देखील आमचा शत्रू असेल असं अमेरिकेनं म्हटलं आहे. मात्र हे सर्व सुरू असताना भारताने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियन यांच्याशी चर्चाच केली नाहीये तर आम्ही आता इराणसोबत व्यापार वाढवत आहोत, असा स्पष्ट संदेश दिला आहे. हा संदेश फक्त भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाचा नाहीये.

तर हा संदेश अमेरिकेसाठी तसेच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी देखील अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार धमकी देण्यात येत आहे, जे देश इराणसोबत कुठलेही व्यापारी संबंध ठेवतील ते देश आमचे शत्रू असतील. परंतु भारताने थेट भूमिका घेत आम्ही इराणसोबत ट्रेड वाढवत आहोत, असं जाहीर करून टाकलं आहे. अमेरिका दीर्घ काळापासून इराणवर आर्थिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. इराणची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून सुरू आहे, याचाच एक भाग म्हणून जो देश इराणसोबत व्यापारी संबंध ठेवेल तो आमचा शत्रू असेल अशी धमकी ट्रम्प यांच्याकडून देण्यात आली आहे. मात्र भारताने ट्रम्प यांच्या या धमकीला न जुमानता इराणसोबत असलेला व्यापार आता अधिक वाढवण्याची भूमिका घेतली आहे. भारताच्या या भूमिकेमुळे ट्रम्प यांच्या स्वप्नाला सुरूंग लागला आहे. एका अर्थाने भारताने अमेरिकेला दिलेला हा सर्वात मोठा धक्का आहे, असं मानलं जात आहे.

Loading...

डोनाल्ड ट्रम्प यांना भारताचा संदेश

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प इराणसोबत आर्थिक संबंध ठेवू नका, यासाठी संपूर्ण जगाला धमकावत आहेत. मात्र जर अशा स्थितीमध्ये अमेरिकेचं ऐकलं तर दबाव वाढू शकतो. त्यामुळे भारताने आधीच हा दबाव झुगारून लावला आहे. इराणच्या राष्ट्रपतींसोबत चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवर स्पष्ट शब्दात लिहिलं आहे की, या चर्चेमध्ये दोन्ही देशांमधील संबंध अधिक घट्ट करण्यावर जोर देण्यात आला आहे, तसेच आम्ही आता इराणसोबत व्यापार वाढवत आहोत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us