AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Cabinet Expansion | बिहारमध्ये नितीशकुमारांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; सर्वाधिक मंत्रिपदं कुणाकडे?

बिहारमधील नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. Bihar Cabinet expansion today BJP got nine births JDU got eight births

Bihar Cabinet Expansion | बिहारमध्ये नितीशकुमारांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; सर्वाधिक मंत्रिपदं कुणाकडे?
नितीश कुमार
| Updated on: Feb 09, 2021 | 12:53 PM
Share

पाटणा: बिहारमधील नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर 80 दिवसांनी पहिला मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. या विस्तारामध्ये भाजपच्या (BJP) वाट्याला 9 तर जेडीयूच्या (JDU ) वाट्याला 8 मंत्रिपद गेली आहेत. भाजपचे प्रवक्ते शहानवाझ हुसैन यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं 74 तर जेडीयूनं 43 जागांवर विजय मिळवला होता. (Bihar Cabinet expansion today BJP got nine births JDU got eight births)

शहानवाझ हुसैन यांना कॅबिनेट

भाजपाकडून दिल्लीमध्ये माध्यमामंध्ये पक्षाची बाजू मांडणारे शहानवाझ हुसैन यांना भाजपनं विधानपरिषदेवर निवडून आणलं आहे. माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या रिक्त झालेल्या जागेवर हुसैन यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून त्यांच्याशिवाय प्रमोद कुमार, आलोक रंजन, नितीन नविन, नीरज सिंह, नारायण प्रसाद, सुभाष सिंह, सम्राट चौधरी यांना संधी दिली जाणार आहे.

जेडीयूकडून कुणाला संधी

नितीशकुमारांच्या जेडीयूकडून श्रवण कुमार, संजय झा, लेशी सिंह, सुनील कुमार , जामा खान यांना मंत्रिपद मिळणार आहे. सोमवारी नितीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपकडून यादी मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याची माहिती दिली होती.

सध्या नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात 14 कॅबिनेट मंत्री आहेत. त्यापैकी 7 मंत्रिपद भाजपकडं आहेत तर 5 जेडीयू आणि 1 जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थान आवाम मोर्चाकडे 1 आणि विकासशील इन्सान पार्टीकडे 1 मंत्रीपद आहे. बिहारच्या मंत्रीमंडळात जास्तीत जास्त 36 जणांचा समावेश केला जाऊ शकतो.

शहानवाझ हुसैन यांना मंत्रिपद भाजपची खेळी काय?

अनेक वर्षांपासून दिल्लीत रुळलेल्या शाहनवाज हुसैन यांना बिहारमध्ये पाठवण्याचा निर्णय अनपेक्षित मानला जात आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानपरिषदेच्या निवडणुकीत शाहनवाज हुसैन यांची बिनविरोध निवड झाली होती. मात्र, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हुसैन यांनाही आपल्याला बिहारमध्ये जावे लागेल, याची कल्पना नव्हती. आता यामागे भाजपने नक्की काय गणिते आखली आहेत, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

इतर बातम्या:

Photo | सरपंच, उपमुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री, गोपीनाथ मुंडेंचा थक्क करणारा प्रवास

PHOTO : बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यातील दुर्मिळ क्षणचित्रं… (Bihar Cabinet expansion today BJP got nine births JDU got eight births)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.